Corona LIVE : माझं पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं, घाबरु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

कोरोना विषाणूबाबत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि सर्व अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर...

Corona LIVE : माझं पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं, घाबरु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
Picture

माझं पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं, घाबरु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन, जीवनावश्यक सोयी-सुविधा सुरुच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये

24/03/2020,10:28AM
Picture

नागपूर : संचारबंदी असताना रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अनोखी शिक्षा, रस्त्यावर फिरणाऱ्यांना डिटेन करुन त्यांना उन्हात नाकाबंदीच्या कामावर लावलं, संचारबंदीत फिरल्यानं पोलिसांवर येणारा ताण कळावा म्हणून रिकामे फिरणाऱ्यांना अनोखी शिक्षा, कोराडी नाका परिसरात बाहेर फिरणाऱ्या 8 ते 10 जणांना डिटेन करुन लावलं नाकाबंदीला

24/03/2020,3:40PM
Picture

24/03/2020,3:29PM
Picture

24/03/2020,3:29PM
Picture

24/03/2020,3:28PM
Picture

24/03/2020,3:26PM
Picture

कोरोना बरा होऊ शकतो, 106 रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर, 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो – आरोग्यमंत्री राजेश टोपे

24/03/2020,3:20PM
Picture

महाराष्ट्रातील तीनच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू, फिलिपाईन्सचा नागरिक कोरोना निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

24/03/2020,3:18PM
Picture

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवली

24/03/2020,2:32PM
Picture

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 30 जून 2020 पर्यंत मुदत वाढ

24/03/2020,2:32PM
Picture

कल्याण : कल्याणचे एपीएमसी मार्केट शासनाकडून बंद नाही, गुरुवारपासून काही व्यापारी एपीएमसी मार्केट बंद करण्याच्या विचारात, अजून ठोस निर्णय नाही, हा बंद व्यापाऱ्यांसाठी नाही, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाबाजी पोखरकर यांची माहिती

24/03/2020,1:45PM
Picture

वाशिम : संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाशिम जिल्हाधिकारी यांनी दिली मुभा, पाटणी चौकात मिळणारा भाजीपाल्याची आता जिल्हा क्रीडा मैदानात व्यवस्था, नागरिकांनी गर्दी टाळणे आवश्यक

24/03/2020,1:43PM
Picture

मुंबईत कोरोनाचा चौथा बळी, 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

24/03/2020,12:17PM
Picture

कोरोना चाचणी करणारं देशातील पहिलं किट पुण्यात विकसित

कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा अचूक निदान करणारा देशातलं पहिलं किट विकसित, या किटला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची((डी सी जी आय)) सोमवारी मान्यता, कोरोानानिदानासाठी देशात रोज दहा हजार जणांची चाचणी शक्य, मायलॅब डिस्कवरी सोलुशनने किट केलं विकसित, यापूर्वी हे किट केंद्र सरकार आयात करून प्रयोगशाळांना देत होतं, मात्र आता हे किट भारतीय पुण्यातील कंपनीने विकसित केलंय, या किटचे गुणवत्ता आणि अचूक रोगनिधनाची काटेकोर तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केली, देशातील हे किट पहिलं असल्याचा दावा करण्यात आला आहे, हे किट विकसित करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो. रुग्णाचे अचूक निदान अत्यंत गरजेचे आहे मात्र ते न झाल्यास मोठा सामाजिक फटका बसू शकतो त्यामुळे याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. कीटला उत्पादनाची परवानगी मिळाल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्रसिद्ध केलं, रोज एका शिफ्टमध्ये 10 हजार उत्पादन करण्याची क्षमता, उत्पादनक्षमता वाढवण्यात येणार

24/03/2020,11:47AM
Picture

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून बेदम चोप

औरंगाबाद – संचारबंदीतही नागरिकांचा संचार, पोलिसांकडून थेट लाठी प्रसाद सुरू, जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिसांकडून बेदम चोप,विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून बेदम चोप,

24/03/2020,11:21AM
Picture

राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक लांबणीवर

24/03/2020,11:31AM
स्कसाठा जप्त” date=”24/03/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ] वांद्र्यात कोट्यवधी रुपयांचा मास्कसाठा जप्त, गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी [/svt-event]

Picture

'कोरोना'ला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी, भाजी खरेदीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर

24/03/2020,11:18AM
Picture

औरंगाबादेतील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह

24/03/2020,11:16AM
Picture

जमावबंदीच्या काळात रत्नागिरी ट्राफिक पोलिसांकडून विक्रमी दंड वसुली

रत्नागिरी : जमावबंदीच्या काळात रत्नागिरी ट्राफिक पोलिसांकडून विक्रमी दंड वसुली, आदेशाचं पालन न करणाऱ्यांकडून 6 लाख 29 हजारांचा दंड वसूल, जिल्ह्यातील 1,614 वाहन चालकांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाई, एका दिवसात तब्बल 6 लाख 29 हजार 600 रूपयांची दंडात्मक कारवाई

24/03/2020,9:28AM
Picture

पुणे मार्केट यार्ड 25 ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा अडत्यांचा निर्णय

पुणे : मार्केट यार्ड 25 ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा अडत्यांचा निर्णय, गुळ भुसार बाजार देखील 31 मार्चपर्यंत बंद, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या बैठकीत निर्णय, 31 मार्चपर्यंत फळे भाजीपाला कांदा-बटाटा बाजार बंद, सात दिवस मार्केट यार्डातील सर्व विभाग बंद राहणार, त्याचबरोबर गुळ आणि भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दि पूना मर्चंट चेंबरच्या बैठकीत घेतला, यापूर्वी मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग बंद होता, पण भुसार बाजार चालू होता, पण आता गुळ आणि भुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

24/03/2020,9:20AM
Picture

सोलापूर : होम क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या 162 व्यक्तींपैकी 70 व्यक्तींना 14 दिवसाच्या निगराणीनंतर सोडून देण्यात आले, तर अद्याप परदेशातून आलेले 92लोक होम क्वारंनटाईनमध्ये, इन्स्टिट्युट क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या 48 पैकी 27 जणांना 14 दिवसाच्या तपासणीनंतर घरी सोडले, आता 21 व्यक्ती इन्स्टिट्यूट क्वारंनटाइन मध्ये

24/03/2020,9:18AM
Picture

नांदेडमध्ये पेट्रोल डिझेल बंदीचा आदेश मागे

नांदेड: पेट्रोल डिझेल बंदीचा आदेश मागे, संचारबंदीचे नियम पाळून इंधन विक्री होणार, जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन यांनी आपला निर्णय बदलला.

24/03/2020,9:11AM
Picture

नागपुरात 16 नवे कोरोना संशयित रुग्ण

नागपूर : नागपुरात नव्यानं 16 कोरोना संशयित मेयो आणि मेडिकल या शासकीय रुग्णालयात दाखल, सोळाही संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले, संशयितांच्या रिपोर्टची प्रतीक्षा, नागपुरात सध्या चार कोरोनाबाधित रुग्ण

24/03/2020,9:09AM
Picture

पुण्यातील कोरोना बाधित महिलेची स्थिती गंभीर

पुणे : पुण्यातील कोरोना बाधित महिलेची स्थिती गंभीर, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर, कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या आणि अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 41 वर्षे महिलेची स्थिती गंभीर

24/03/2020,9:04AM
Picture

पुण्यातील पहिले रुग्ण दाम्पत्य कोरोना निगेटिव्ह

पुणे : पुण्यातील पहिले रुग्ण दाम्पत्य निगेटिव्ह, विलगीकरणानंतरची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर दिलासा, दुबईहून परतलेल्या पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली होती, 24 तासाने पुन्हा दुसरी चाचणी केली जाणार, ही चाचणी निगेटिव्ह आल्यास मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी घरी सोडले जाईल

24/03/2020,9:02AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पेट्रोल-डिझेल विक्रीस बंदी

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्रीस बंदी, नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंदी, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांना पेट्रोल भरण्यास मनाई, सूट देणाऱ्या व्यक्तींनी एकदाच टाकी फुल करणे बंधनकारक आहे

24/03/2020,8:59AM
Picture

सातारा : कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेला 63 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, साताऱ्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनवर, एका दिवसात दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह,जिल्हा शल्यचकित्सक अमोद गडीकर यांची माहिती

24/03/2020,8:56AM
Picture

सांगली : आपल्या इस्लामपूरात कोरोनाचे चार रुग्ण पॉझिटिव्ह, आपण यातून बोध घ्यायला हवा, भाजी मंडई आणि इतर ठिकाणी केली जाणारी गर्दी आता थांबवली पाहिजे, सांगलीचे पालक मंत्री जयंत पाटील

24/03/2020,8:55AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *