AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिळ्यांचा आईसोबत कोरोनाशी लढा, तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह

जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.

तिळ्यांचा आईसोबत कोरोनाशी लढा, तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह
| Updated on: Oct 29, 2020 | 10:45 PM
Share

रायपूर : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका कोरोना बाधित गरोदर महिनेले तीन मुलांना जन्म दिला. मात्र, या तिळ्यांना कोरोनाची कोणतीही बाधा झाली नाही. या सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Corona positive woman gives birth to 3 healthy children in Raipur AIIMS).

कोरोना बाधित ही 28 वर्षीय महिला 18 ऑक्टोबरला रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल झाली. तिने तीन मुलांना जन्म दिला होता. आईला कोरोना बाधा असल्याने मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा खूप धोका होता. त्यामुळे या तिन्ही मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तिघेही अगदी ठणठणीत असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “या महिलेची प्रसुती खूप आव्हानात्मक होती. तिन्ही मुलांना जन्मानंतर लगेचच ऑक्सिजन देण्याची आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडली होती. तिन्ही नवजात बाळांची पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. असं असलं तरी खबरदारी म्हणून त्यांच्या आणखी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

कोरोना बाधित महिलेने तीन मुलांना जन्म देण्याची एम्समधील ही पहिलीच घटना आहे. नुकताच तामिळनाडुमध्ये (Tamil Nadu) कोविड-19 चा संसर्ग झालेल्या 44 वर्षीय गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. कोरोना संसर्गासह प्रसुतीशी संबंधित काही गुंतागुंतींमुळे डॉक्टरांना संबंधित महिलेची सर्जरी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेतील आई आणि मुलं अगदी सुरक्षित आहेत. या महिलेला अनेक वर्षांपासून मुलं नव्हती.

हेही वाचा :

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरीपार

Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा

Good News: लवकरच येणार कोरोना वॅक्सिन, डिसेंबरपर्यंत मॉडर्ना लसीला मिळणार मंजुरी

Corona positive woman gives birth to 3 healthy children in Raipur AIIMS

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.