डॉ. दाभोलकर हत्या : पुनाळेकर आणि भावेला 4 जूनपर्यंत CBI कोठडी

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने याबाबत आदेश दिले आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना 25 मे रोजी मुंबईतून अटक केली होती. यानंतर त्याचदिवशी पुण्याच्या  सत्र न्यायालयात …

डॉ. दाभोलकर हत्या : पुनाळेकर आणि भावेला 4 जूनपर्यंत CBI कोठडी

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने याबाबत आदेश दिले आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना 25 मे रोजी मुंबईतून अटक केली होती. यानंतर त्याचदिवशी पुण्याच्या  सत्र न्यायालयात त्या दोघांना हजर केलं गेलं. त्यावेळी न्यायलयाने या दोघांनाही 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. यानंतर या प्रकरणी आज 1 जून रोजी सत्र न्यायलयात सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान सत्र न्यायलयानं या दोघांच्यी सीबीआय कोठडीत चार दिवसांची म्हणजेच 4 जूनपर्यंत वाढ केली आहे.

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत. या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना 25 मे रोजी अटक केली  होती.

दरम्यान आतापर्यंत सीबीआयने पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. लॅपटॉप आणि मोबाईलची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय याप्रकरणी या दोघांचा हत्येचा कट रचणे, हत्या करणे याबाबत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक अधिनियमानुसार तपास करण्यात येत आहे. यामुळे या प्रकरणी पुनाळेकर आणि भावे यांच्या चौकशीसाठी 14 दिवस सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.

मात्र, बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला. त्याच प्रमाणेच संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावरील आरोप जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी ही बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.

प्रकरण काय ?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर  यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) 10 ऑगस्ट 2018 नालासोपारा येथे धाडी टाकल्या होत्या. या धाडीत मोठ्या प्रमाणावर बॉम्ब तयार करण्याचं साहित्य सापडलं होतं. या प्रकरणात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *