केवळ स्पर्श आणि आवाजाची मदत, 450 फूट कातळधार धबधब्यावर अंध ट्रेकरचं यशस्वी रॅपलिंग

पुण्यातील एका अंध ट्रेकरने कमाल दाखवली. अजय ललवाणी (Ajay Lalwani Blind trekker) या पठ्ठ्याने अंध असूनही थरारक लोणावळ्यातील कातळधार धबधब्यावरुन अलगद रॅपलिंग केलं. केवळ आवाज आणि स्पर्शाने अजयने (Ajay Lalwani ) रॅपलिंग केलं. अजयच्या या कसरती पाहून अनेकजण अवाक् झाले.

केवळ स्पर्श आणि आवाजाची मदत, 450 फूट कातळधार धबधब्यावर अंध ट्रेकरचं यशस्वी रॅपलिंग

पुणे :  पावसाळा सुरु झाल्यानंतर धबधबे आणि ट्रेकिंगला (Monsoon Trekking) जाणाऱ्यांची संख्या वाढते. पर्यटन स्थळं, गडकिल्ले याठिकाणी ट्रेकर्स पाहायला मिळतात. अनेक अवघड चढण चढताना भल्याभल्यांची दमछाक होते. धडधाकट माणसांना अनेकवेळा ट्रेकिंग हे कठीण होऊन बसतं. अशावेळी पुण्यातील एका अंध ट्रेकरने कमाल दाखवली. अजय ललवाणी (Ajay Lalwani Blind trekker) या पठ्ठ्याने अंध असूनही थरारक लोणावळ्यातील कातळधार धबधब्यावरुन अलगद रॅपलिंग केलं. केवळ आवाज आणि स्पर्शाने अजयने (Ajay Lalwani ) रॅपलिंग केलं. अजयच्या या कसरती पाहून अनेकजण अवाक् झाले.

लोणावळा येथून राजमाची किल्ल्याकडे जाताना कातळधार धबधबा लागतो. असंख्य पर्यटकांचं हे आकर्षणाचं ठिकाण आहे. कातळ म्हणजे उभा कडा आणि धार म्हणजे धबधबा. साधारण 450 फूट उंच, सरळसोट आणि चढायला अवघड असलेला कातळधार सर करणे हे अनेक ट्रेकर्स स्वप्न असतं. ते स्वप्न अजयचंही होतं.

अजय ललवाणी हा 24 वर्षीय तरुण मुंबईजवळच्या उल्हासनगरचा रहिवासी आहे. जन्मापासून तो दृष्टीहीन आहे. असं असलं तरी अजय अनेक अवघड खेळात पारंगत आहे.

अजय वेगवेगळे अडव्हेंचर गेम, ज्युदो कराटे, सायकलिंग अशा अनेक प्रकारात पारंगत आहेच, पण त्याने स्विमिंगमध्येही गोल्ड मेडल पटकावलं आहे.

जन्मापासून दिसत नसलेल्या अजयने अंधत्वावर मात करत, अनेक साहसी खेळात पराक्रम गाजवला आहे. गडकिल्ले सर करण्यात तर तो पारंगत आहे. रॅपलिंगसारखा कठीण प्रकारही अजयने करुन दाखवला.

सर्वसामान्यांना रॅपलिंग करत उतरण्यास 15 ते 20 मिनिटे वेळ लागणारा कातळधार धबधबा, अजयने अवघ्या 4 मिनिटात उतरुन दाखवला. एक दोनदा नव्हे तर तब्ब्ल तीन वेळा त्याने हा पराक्रम केला आहे.

जन्मतःच अंध असला तरी बुद्धिमान आणि साहसी असलेला अजय हा मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहे. भविष्यात सर्वोच्च पर्वत माउंट एव्हरेस्ट सर करायचं त्याचं स्वप्न आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *