AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“खडसेंवर अन्याय नाही, त्यांना पक्षाने खूप संधी दिली, मुलीच्या पराभवामुळे ते बोलत आहेत”

भाजपचे 12 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी फेटाळलं आहे.

खडसेंवर अन्याय नाही, त्यांना पक्षाने खूप संधी दिली, मुलीच्या पराभवामुळे ते बोलत आहेत
| Updated on: Dec 05, 2019 | 4:13 PM
Share

मुंबई : भाजपचे 12 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी फेटाळलं आहे. “मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाचे कुठलेही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या संपर्कात नाहीत. आणि खासदार तर त्याहूनही नाहीत”, असं संजय काकडे (Sanjay Kakde) म्हणाले.

“माझ्या माहितीप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाला कुठली राज्यसभेचा खासदार पक्ष सोडणार नाही. आताच्या पोझिशनमध्ये कुठल्याही 12 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत जातील असे वाटत नाही, कारण काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची आघाडी झाली आहे. ती आघाडी विनाकारण या बारा आमदारांना निमंत्रण देणार नाही. कारण आघाडीकडे 170 चा आकडा आहे. विनाकारण कोण कशाला आमंत्रण देईल? आणि आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये असे कमी वेळ झाले की निवडणूक झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यात आमदारांनी राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक झाली. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नाही” असा दावा संजय काकडे यांनी केला.

निवडणुकीपूर्वी रथी-महारथी आमच्या संपर्कात होते. राधाकृष्ण विखे असतील, मधुकर पिचड असतील या सगळ्यांनी शेवटच्या तीन महिन्यात पक्ष सोडला. उदयनराजे भोसले यांचा अपवाद सोडता, कुणी असं झटपट महिन्या दोन महिन्यात राजीनामा देत नसतं. पोटनिवडणुकांमध्ये जिंकून येण्याची शाश्वती नसते. उदयनराजेंनी राजीनामा दिला, 3 महिन्यानंतर निवडणूक झाली. जनतेचा रोष आम्हाला बसला आणि तिथे उदयनमहाराजांचा पराभव झाला. त्यामुळे बारा आमदार काय कोणीच आमदार असो फुटणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले.

आघाडीने अशी चर्चा करण्यापेक्षा राज्यातल्या जनतेचा विकास करावा. सत्तास्थापन केले, विकास काय करायचा ते ठरवा.  मंत्रिमंडळाचा विस्तार करा, मग या गोष्टींचा विचार करा, असा सल्ला काकडेंनी दिला.

निवडणूक स्वतःहून कोणी लावून घेणार नाही. आम्ही अशा बातम्या केल्या होत्या की आमच्याशी संपर्क आमदार आहेत पण प्रत्यक्षात कोणी होतं का ? नंतर लोकांना काही गोष्टींचा विसर पडला, असंही काकडे म्हणाले.

मी 40 आमदार आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत असं म्हटलं नव्हतं. चाळीस आमदारांची अशी इच्छा होती की इतर पक्षांसोबत जाण्यापेक्षा भारतीय जनता पक्षासोबत आपण जाऊ, असं म्हटल्याचं काकडेंनी स्पष्ट केलं.

‘एकनाथ खडसेंवर कोणताही अन्याय नाही’

माझ्या माहितीप्रमाणे पंकजा मुंडे पक्षावर नाराज नाहीत. विरोधकांनी पंकजा मुंडे कुठल्यातरी पक्षात जाणार, पक्ष सोडणार अशा बातम्या पेरल्या. पण काल पंकजाताईंनी आपण भारतीय जनता पक्ष सोडणार नाही, मी गद्दार नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. राहिला प्रश्न एकनाथ खडसे यांच्याविषयी तर एकनाथ खडसे यांना पक्षाने खूप संधी दिली. महसूलमंत्रिपदाची संधी दिली. त्यांची नाराजी असेल काही कारणासाठी, परंतु ते आपल्या मुलीच्या पराभवामुळे बोलत असतील. आपल्या मुलांना निवडून आणता न आल्यामुळे, अपयशामध्ये ते काही गोष्टी बोलत असतील असं मला वाटतं. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असं काही झालं नाही, असा दावा संजय काकडे यांनी केला.

भाजप सोडण्याची चर्चा असणारा तो खासदार कोण?

भाजप सोडण्याची चर्चा असणारा राज्यसभेवरील खासदार तुम्ही तर नाही ना? असा प्रश्न काकडे यांना विचारण्यात आला. त्यावर संजय काकडे म्हणाले, “मी बातमी वाचली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हटले आहे. मी भारतीय जनता पक्षाचा खासदार नाही. मी सहयोगी सदस्य आहे. अपक्ष आहे. भारतीय जनता पक्ष सोडण्याचा माझा काही विचारही नाही आणि काही कारणही नाही. असे कुठलेही कारण नाही की आजही सत्ता आली म्हणून मी त्यांच्या मागे जाऊ. मी कधीही कुठल्या पक्षाचा सदस्य नव्हतो. मी भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य आहे. कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य राहील”.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.