शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटलांची सटकली, गिरीश महाजनांसमोर संताप

भाजपचे बंडखोर भाजपच्याच चिन्हावर निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि भाजपच्या वरिष्ठांना सांगूनही कारवाई कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. 

शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटलांची सटकली, गिरीश महाजनांसमोर संताप

जळगाव : जळगाव जिल्ह्यात भाजपच्या बंडखोरीवरुन शिवसेनेचे ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार गुलाबराव पाटील हे चांगलेच संतापले (Shivsena Gulabrao Patil Get Angry). आज (13 October) जळगावात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi Rally in Jalgaon) यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचार सभा आहे. अशा वेळी शिवसेना उमेदवार संतापल्याने काही काळ सभास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. यावेळी चिडलेल्या गुलाबराव पाटलांची गिरीष महाजनांकडून (Girish Mahajan) समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गुलाबराव पाटील हे काही मानायला तयार नव्हते (Shivsena Gulabrao Patil Get Angry).

भाजपचे बंडखोर भाजपच्याच चिन्हावर निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि भाजपच्या वरिष्ठांना सांगूनही कारवाई कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

आज (13 ऑक्टोबर)जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभास्थळी येऊन सगळ्यांनाच धक्का दिला. आपल्याला सभेत बोलू द्यावं अशी मागणी त्यांनी केली. युती झाली असूनही अनेक ठिकाणी भाजपाचे बंडखोर पक्षाचं चिन्ह वापरत प्रचार करत असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

‘मी महायुतीचा सामान्य कार्यकर्ता आहे. मी लोकसभेतही युतीसाठी काम केलं. जर कुठल्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार उभा असेल, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि शिवसेनेचा उमेदवार उभा असेल, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. जळगाव जिल्ह्यात चार जागा शिवसेना लढत आहे, त्या चारही ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, ते भाजपच्या चिन्हावर प्रचार करत आहेत. गळ्यात भापजचा गमछा घालून अधिकृत भाजपचे बंडखोर म्हणून ते रॅली काढत आहेत. आज जळगावात महायुतीच्या दिग्गज नेत्यांची सभा आहे. त्यामुळे मला असा विश्वास आहे की ते त्यांचा आदेश पाळतील. उद्धव ठाकरे यांनाही मी याबाबत लिखित तक्रार दिली आहे. आजच्या सभेत मला बोलू द्यायला हवं असं मला वाटतं, अशी भूमिका यावेळी गुलाबराव पाटील यांनी मांडली.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *