Corona : तब्लिगी जमातचे 60 सदस्य गायब, मोबाईलही स्विच ऑफ, महाराष्ट्राची चिंता वाढली

तब्लिगींच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रात आलेल्या 60 जणांनी आपला फोन स्विच ऑफ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Corona : तब्लिगी जमातचे 60 सदस्य गायब, मोबाईलही स्विच ऑफ, महाराष्ट्राची चिंता वाढली

मुंबई : देशभरात कोरोनाचा (Corona Virus) कहर वाढत चालला (Tabligi Members Mobile Switched Off) आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 1018 रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तब्लिगी जमातच्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढली (Tabligi Members Mobile Switched Off) आहे.

त्यामुळे राज्य सरकारने या तब्लिगींना पोलिसांकडे संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं (Tabligi Members Mobile Switched Off). मात्र, तब्लिगींच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रात आलेल्या 60 जणांनी आपला फोन स्विच ऑफ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

हेही वाचा : मुंबईत 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्ह्याची नोंद

“निजामुद्दीन येथील मरकज येथून परतेल्या तब्लिगी जमातच्या जवळपास 60 जणांनी सरकारशी संपर्क केलेला नाही. त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत आहे”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“ज्या तब्लिगींनी अद्याप संपर्क केलेला नाही, त्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन संपर्क करावा आणि तपासणी नंतर क्वारंटाईनमध्ये राहावे. जर त्यांनी असं केलं नाही, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवोई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत”, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला.

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात सध्या 1018 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी 52 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यापैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 536 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 34 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 150 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे (Tabligi Members Mobile Switched Off).

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई369323741173
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
39863678
नवी मुंबई मनपा24618050
कल्याण डोंबिवली मनपा11919119
उल्हासनगर मनपा2676
भिवंडी निजामपूर मनपा108116
मिरा भाईंदर मनपा62515713
पालघर 13713
वसई विरार मनपा77610520
रायगड553515
पनवेल मनपा44614
नाशिक (शहर +ग्रामीण)33828
मालेगाव मनपा73252
अहमदनगर (शहर+ग्रामीण)96366
धुळे13516
जळगाव 555169
नंदूरबार 333
सोलापूर7694162
सातारा459316
कोल्हापूर 37924
सांगली104291
सिंधुदुर्ग2120
रत्नागिरी21625
औरंगाबाद14101465
जालना1170
हिंगोली 14310
परभणी421
लातूर 10883
उस्मानाबाद 6430
बीड460
नांदेड 1086
अकोला 5371428
अमरावती 20216
यवतमाळ 128220
बुलडाणा 5683
वाशिम 80
नागपूर511849
वर्धा 1101
भंडारा2500
गोंदिया 5810
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3100
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)56013
एकूण62228269972098

 

संबंधित बातम्या :

तब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

नागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *