India Corona : सलग 4 दिवस देशात दररोज 4 हजारपेक्षा नव्या रुग्णांची भर! जाणून गेल्या 24 तासांतली रुग्णवाढ!

महाराष्ट्रात शनिवारी 1,000 हून अधिक कोरोना केसेसची नोंद करण्यात आलीये. 20 फेब्रुवारीनंतर 1,437 नवीन केसेस नोंदवण्यात आल्या. संपूर्ण राज्यातील 60 टक्क्यांहून अधिक प्रकरणे मुंबईतील आहेत. काल फक्त एका मुंबई शहरामध्ये 889 नवीव कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने गेल्या 24 तासांत 4,13,699 कोरोना चाचण्या केल्या आहेत.

India Corona : सलग 4 दिवस देशात दररोज 4 हजारपेक्षा नव्या रुग्णांची भर! जाणून गेल्या 24 तासांतली रुग्णवाढ!
Image Credit source: pixabay.com
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 12:57 PM

मुंबई : देशात कोरोनाच्या (Corona) रूग्णांमध्ये दणक्यात वाढ होताना दिसते आहे. कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरवण्यास सुरूवात केलीये. कोरोनाच्या केसेस कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले. मात्र, आता येणारी आकडेवारी (Statistics) धडकी भरवणारी आहे. 24 तासांमध्ये देशात तब्बल 4,270 कोरोनाच्या केसेसची नोंद करण्यात आलीये. तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच भारतामध्ये 4,000 च्यावर कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता भारतामधील कोरोनाच्या सक्रिय केस 24,052 आहेत. जे देशातील एकूण पॉझिटिव्ह (Positive) केसेसपैकी 1.03 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

महाराष्ट्रात शनिवारी 1,000 हून अधिक कोरोना केसेसची नोंद करण्यात आलीये. 20 फेब्रुवारीनंतर 1,437 नवीन केसेस नोंदवण्यात आल्या. संपूर्ण राज्यातील 60 टक्क्यांहून अधिक प्रकरणे मुंबईतील आहेत. काल फक्त एका मुंबई शहरामध्ये 889 नवीव कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने गेल्या 24 तासांत 4,13,699 कोरोना चाचण्या केल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 85.26 कोटी चाचण्या झाल्या आहेत आणि हे अत्यंत सकारात्मक बाब आहे.

हे सुद्धा वाचा

देशामध्ये लसीकरण मोहिम सुरू

देशामध्ये लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 194.09 (1.94.09.46.157) पेक्षा जास्त लसीचे डोस दिले आहेत. 12 ते 14 वर्षे वयोगटासाठी लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू झाले. आतापर्यंत, 3.44 कोटींहून अधिक लोकांना कोरोना पहिला डोस देण्यास आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 193.53 कोटींहून अधिक लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.