Junk food: जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढते जंक फूड खाण्याची इच्छा ? 56 टक्के पालकांचे मत

फास्ट फूड किंवा जंक फूड खाल्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलांची ही पदार्थ खायची इच्छा वाढते असे मत काही पालकांनी नोंदवले आहे.

Junk food: जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढते जंक फूड खाण्याची इच्छा ? 56 टक्के पालकांचे मत
जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये ते पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, असे मत 56 टक्के पालकांनी व्यक्त केले.
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 10:53 AM

नवी दिल्ली – आजकाल मुलांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे फास्ट फूड किंवा जंक फूड (junk food)खायला जास्त आवडतं.मात्र त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पॅकेज्ड फूडच्या अथवा पदार्थांच्या जाहिरातींमुळे मुलांची ते पदार्थ खाण्याची इच्छा किंवा क्रेव्हिंग (craving) वाढते, असे मत सुमारे 56 टक्के भारतीय पालकांनी नोंदवले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. हे सर्वेक्षण एका कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लोकल सर्कलद्वारे करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार 92 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, सरकारी नियमानुसार पॅकबंद पदार्थांची जाहिरात करणाऱ्यांनी मुलांना लक्ष्य (target)करणे बंद केले पाहिजे. या सर्व्हेमध्ये काय सांगण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

बालदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाली सर्वेक्षणातील माहिती

हे सुद्धा वाचा

पॅकबंद पदार्थांची जाहिरात दाखवली गेली नाही तर मुलांचे जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी होईल का असा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान पालकांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 56 टक्के पालकांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी तर 12 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 18 टक्के पालकांनी असे होण्याची शक्यता वर्तवली.

त्याचसोबत, जागतिक पातळीवरील काही पॅकेज्ड फूड कंपन्यांनी आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून 16 वर्षांखालील मुलांना लक्ष्य न करण्याची पद्धतही अवलंबली आहे.

भारतातील पॅकेज्ड फूड कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींद्वारे 16 वर्षांखालील मुलांना लक्ष्य करू नये, असे नियमही सरकारने करावेत का?, असा प्रश्न या सर्वेक्षणात काही ग्राहकांना विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना 81 टक्के ग्राहकांनी हो असे दिले. तर 11 टक्के लोकांनी यास सहमती दर्शवली मात्र ते 12 वर्षांखालील मुलांसाठी असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र 4 टक्के लोकांनी, असा नियम करू नये, तर पॅकेज्ड फूड कंपन्यांनी हे स्वेच्छेने करावे, असे मत व्यक्त केले. पॅकेज्ड फूडच्या जाहिरातींच्या माध्यमातून मुलांना आमिष दाखवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी सरकारने नियम केला पाहिजे, असे मत एकूण 92 टक्के लोकांचे आहे.

ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाने 2013 साली अन्न व पेयांसाठी सेल्फ रेग्युलेटरी गाइडलाइन्समध्ये (मार्गदर्शक तत्वं) मुलांच्या फूड मॉडेलचा वापर करण्याबद्दल स्पष्टपणे माहिती दिलेली नाही. त्यामुळे जाहिरातीतील पॅकबंद पदार्थांमुळे त्यांच्या (मुलांच्या) आरोग्यावर परिणाम होऊ शकेल, असे ग्राहकांना वाटते.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.