AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke Typhoid : अभिजीत दिपके यांना टायफाईड, किती धोकादायक आहे हा आजार ?

टायफॉइडच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला डीहायड्रेशन होऊ शकते. अशा स्थितीत, IV द्वारे द्रवपदार्थ आणि आवश्यक औषधे देण्यात येतात. IV द्वारे दिलेली औषधे थेट रक्तप्रवाहात पोहोचतात, ज्यामुळे ती अधिक प्रभावी ठरतात, अभिजीत दिपके यांना टायफॉइडचे निदान झाले आहे.

Abhijeet Dipke Typhoid : अभिजीत दिपके यांना टायफाईड, किती धोकादायक आहे हा आजार ?
Abhijeet Dipke Typhoid
| Updated on: Jul 26, 2026 | 9:04 PM
Share

Abhijeet Dipke Typhoid : पावसाळ्यात अचानक ऋतूबदल होतो आणि बॅक्टेरियांना मोकळे रान मिळते. त्यात टायफॉईड असा आजार आहे ज्याला लोक साधा ताप म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, जर वेळीच उपचार न केले तर हा आजार गंभीर रुप घेऊ शकतो. अलिकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करुन त्यांना टायफाईल झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले.

रक्ताच्या तपासणीत Abhijeet Dipke यांना Typhoid झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना रोज सकाळ आणि सायंकाळी IV (इंट्रावेनस) द्वारे उपचार करावे लागत आहेत. चला तर पाहूयात टायफॉईड हा आजार कसा होतो याची लक्षणे नेमकी काय आणि हा आजार केव्हा खतरनाक रुप धारण करतो हे पाहूयात…

टायफाईड कसा पसरतो ?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार टायफॉईड एक गंभीर बॅक्टेरियल संक्रमण आहे जे साल्मोनेला टाइफी ( Salmonella Typhi ) नावाच्या बॅक्टेरियामुळे होते. हा बॅक्टेरिया दुषित अन्न आणि अस्वच्छ पाण्याद्वारे शरीरात पसरतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर हा वेगाने रक्तात पसरतो आणि संक्रमण वाढवतो. दरवर्षी जगभरात सुमारे १.१ ते २.१ कोटी लोक या टायफॉईडने संक्रमित होतात. आणि सुमारे २ लाख लोकांचा मृत्यू या आजाराने होतो. तर पॅराटायफॉईडचे सुमारे ५० लाख केस दरवर्षी समोर येतात. ज्यात दक्षिण आशियातील लोकांची संख्या जास्त आहे.

टायफाईडची लक्षणे काय असतात ?

टायफाईडची सुरुवातीची सर्वसाधारणपणे बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याच्या १० ते १४ दिवसानंतर दिसू लागतात. या आजारात रुग्णाला हळूहळू तीव्र ताप येऊ लागतो. याशिवाय डोकेदुखी, थकवा, कमजोरी, पोट दुखी, मळमळणे, उल्टीसारखी भावना, भूक कमी लागणे. बद्धकोष्ठता किंवा डायरिया, स्नायूत वेदना आणि शरीरावर चट्टे देखील येऊ शकतात. जर वेळीच उपचार न केले तर हा आजार ३ ते ४ वा त्याहून अधिक काळ राहू शकतो.

टायफॉइड धोकादायक कधी बनतो?

जर वेळेत उपचार केले नाहीत, तर टायफॉइड गंभीर स्वरुप धारण करु होऊ शकतो. आजाराच्या वेगवेगळ्या स्टेजवर रुग्णांना तीव्र ताप, पोट फुगणे, वेगाने वजन कमी होणे, डिहायड्रेशन, भास, आतड्यांचे गंभीर नुकसान, अंतर्गत रक्तस्राव, मेंदूला सूज, मूत्रपिंड निकामी होणे, न्यूमोनिया, स्वादुपिंडाला सूज येणे आणि मेंदुज्वर (मेनिंजायटीस) यांसारख्या गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. सतत तीव्र ताप किंवा इतर गंभीर लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांने जाणे गरजेचे असते.

टायफॉइडचे निदान कसे होते?

टायफॉइडचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी, ब्लड कल्चर, शौचाची आणि लघवीची तपासणी, विडाल टेस्ट आणि टायफी डॉट टेस्ट अशा चाचण्या केल्या जाऊ शकतात. गंभीर प्रकरणांत एंटिबायोटिक्स देऊनही सुधारणा होत नाही, तेव्हा बोन मॅरो कल्चर करण्याची शिफारस देखील केली जाते.

टायफॉइडपासून बचाव कसा करावा ?

टायफॉइड टाळण्यासाठी, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिणे, ताजे आणि संपूर्णपणे शिजलेले अन्न खाणे, जेवण्यापूर्वी आणि अन्न तयार करण्यापूर्वी साबणाने हात धुणे, रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळणे पाहिजे. टायफॉइडचा प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रवास करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टायफॉइडची लस देखील घेतली जाऊ शकते.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?