AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yogurt: आयुर्वेदानुसार दह्याला ‘हे’ पदार्थ अजिबात आवडत नाहीत! मग आपण का रिस्क घ्यायची? जाणून घ्या कोणते पदार्थ…

आयुर्वेदात दही खाण्याला अनेक पैलु सांगीतले आहेत. दही कशा प्रकारे खावे, कोणत्या वेळी, कशा सोबत खावे अशा अनेक गोष्टींचे वर्णन आयुर्वेदात दिले आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

Yogurt: आयुर्वेदानुसार दह्याला 'हे' पदार्थ अजिबात आवडत नाहीत! मग आपण का रिस्क घ्यायची? जाणून घ्या कोणते पदार्थ...
दह्याला 'हे' पदार्थ अजिबात आवडत नाहीत!Image Credit source: facebook
| Updated on: Jun 05, 2022 | 7:39 PM
Share

दही हे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि इतर पोषक तत्वांनी युक्त सुपरफूड (Nutritious superfood) आहे. प्रत्येक ऋतूत हे सहज उपलब्ध असले तरी उन्हाळ्यात ते खाण्याचा आनंद वेगळाच असतो. कुठे ते कोशिबींरीच्या रूपात खाल्ले जाते, तर कुठे लोक लस्सी बनवून पितात. दह्याचे अनेक आरोग्यदायी फायदे (Health benefits) असण्यासोबतच ते त्वचेची काळजी घेण्यातही उत्तम मानले जाते. जरी लोक दही खाण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात, परंतु काही वेळा काही खादय पदार्थ एकत्र खाल्यास, ते आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकतात. काही फूड कॉम्बिनेशन्स सध्या खादयपदार्थांच्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे तुम्ही ते खाऊन पाहू शकता, परंतु त्यामुळे पोटदुखी, अतिसार, ऍसिडिटी आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांना सामोरे जावे लागु शकते. आयुर्वेदात दही खाण्यावरून, काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

दही आणि दूध एकत्र खाणे

काहीवेळा लोक दही आणि दूध एकत्र मिसळण्याची चूक करतात. हे दुधापासून बनवले जात असले तरी आयुर्वेदानुसार या पद्धतीमुळे तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो. दुधामध्ये फळे मिसळून दही खाण्याची चूक लोक करतात. सोशल मिडीयावर व्हिडिओ पाहून काहीही करून पाहण्यापूर्वी योग्य माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार यामुळे पिंपल्स, तसेच छातीत इन्फेक्शन होऊ शकते.

रात्री दही खावे की नाही?

रात्री दही खाणे टाळावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. याचा प्रभाव थंडावा देणारा असतो आणि उन्हाळ्यातही तो तुम्हाला सर्दी किंवा थंडीचा बळी बनवू शकतो, असे मानले जाते. काही लोक रात्रीच्या जेवणासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला थंडगार रायता खाण्याची चूक करतात आणि नंतर ते नाराज होतात.

दही आणि आंबा

सध्याच्या नवीन खादयसंस्कृतीनुसार दही आणि आंबा एकत्र करून, स्पेशल डीश बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु, त्यामुळे आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. आजकाल दही मँगो लस्सीचा ट्रेंड सुरू आहे. जरी ते खूप चवदार दिसत असले तरी ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...