‘या’ 5 पदार्थांमुळे हृदय बनते स्ट्राँग, आजारांपासून बचाव करण्यासाठी ठरतात प्रभावी

| Updated on: Sep 26, 2022 | 1:35 PM

पालक, टोमॅटो, स्ट्रॉबेरी आमि बदाम हे हृदयाला स्ट्रॉंग बनवतात. असे पदार्थ कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ट्रायग्लिसराइडचा स्तर कमी करतात.

या 5 पदार्थांमुळे हृदय बनते स्ट्राँग, आजारांपासून बचाव करण्यासाठी ठरतात प्रभावी
आरोग्यदायी घटक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: हृदय (Heart) हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत रक्त आणि पोषक तत्वांचा पुरवठा करतो. निरोगी हृदयामुळे रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं. चांगली जीवनशैली (good lifestyle) आणि आहारातील योग्य (food habits) बदल, हे हृदय बळकट करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. नियमित व्यायामासह, चांगले खाणे-पिण्याची सवय अवलंबल्यास हृदय निरोगी बनते व संपूर्ण शरीर तंदुरुस्त ठेऊ शकते. मात्र जंक फूडमुळे (junk food) हृदयाचे आरोग्य बिघडू शकते आणि शरीर हे आजारांचे माहेरघर बनू शकते. चांगल्या अन्नपदार्थांची (good and healthy food) निवड करणे म्हणजे निरोगी हृदयाची निवड करणे होय. चांगल्या अन्नामध्ये सुकामेवा, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असतो. कोणकोणते खाद्यपदार्थ हृदय निरोगी आणि मजबूत बनवू शकतात, ते जाणून घेऊयात

आहारात या पदार्थांचा समावेश करा

भाज्या: हेल्थलाइन नुसार, पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन के, नायट्रेट्स, खनिजे आणि ॲंटी- ऑक्सिडेंट्सचा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या पेशी निरोगी बनतात. तसेच बीपी नियंत्रित होतो. यामुळे हृदय मजबूत होते. तर टोमॅटो या भाजीमध्ये लाइकोपीन असते जे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हृदयरोगाशी लढा देते. बीन्स ही भाजी कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि ट्रायग्लिसेराइडची पातळी कमी करते व हृदयाच्या समस्या देखील दूर करते.

सुकामेवा: अक्रोड आणि बदाम हे हृदय मजबूत बनवतात. त्यामध्ये फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असते, जे कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि बेली फॅट कमी करते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

हे सुद्धा वाचा

अख्खी धान्य: ब्राऊन राइस, ओट्स आणि बार्ली यांसारखे अख्खे किंवा संपूर्ण धान्य यामुळे हृदय बळकट होते. त्यांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच त्यामध्ये असलेल्या इतर पोषक घटकांमुळेही शरीर निरोगी होते.

फिश ऑईल: साल्मन, मॅकेरल, सार्डिन आणि ट्यूना यांसारखे मासे, ट्रायग्लिसेराइड, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीपासून हृदयाचे संरक्षण करतात. यात ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे प्रमाण चांगले असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

ब्लॅकबेरी व स्ट्रॉबेरी: ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी ही फळे खाण्यास जितकी चविष्ट असतात तितकीच ती हृदयासाठीही चांगली ठरतात. त्यांच्यामध्ये ॲंथोसायनिनसारखे ॲंटी-ऑक्सिडंट्स असतात, जे तणाव आणि इन्फ्लेमेशनपासून संरक्षण करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.