रात्री येत असेल कोरडा खोकला तर करा ‘ हे ‘ घरगुती उपाय

रात्री झोपताना अनेक लोकांना कोरडा खोकला येण्याचा त्रास होतो. रात्री असा खोकला आल्यास काही घरगुती उपायांनी आराम मिळू शकतो.

रात्री येत असेल कोरडा खोकला तर करा ' हे ' घरगुती उपाय
रात्री येत असेल कोरडा खोकला तर करा ' हे ' घरगुती उपाय Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 11:33 AM

नवी दिल्ली: खोकला (coughing) येणं, ही आपली वायुमार्ग साफ करण्याची एक प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्या शरीरात कफ वगैरे जमा होतो, तेव्हा आपले शरीर ते खोकल्याद्वारे बाहेर काढून टाकते. मात्र हा खोकला सलग काही दिवस टिकून राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. रात्री झोपताना अनेक लोकांना कोरडा खोकला (dry cough)येण्याचा त्रास होतो. या कोरड्या खोकल्यामुळे तुमची झोप (distubed sleep) तर खराब होतेच त्याशिवाय छातीतही दुखत राहतं. पण रात्री उद्भवणाऱ्या या कोरड्या खोकल्यावर घरगुती उपायांनी (home remedies to get relief) मात करता येते. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.

आलं आणि गूळ

गुळाचा वापर करणं, त्याचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं, असं म्हटल जातं. त्यामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे गुळाचे सेवन केल्यास आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. कोरडा खोकला दूर करण्यासाठी गुळ आणि आलं यांचं सेवन करावं. त्यासाठी एका भांड्यात थोडासा गूळ गरम करून, त्यात आलं किसून त्याचा रस मिक्स करावा. आता हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने चाखावे. याचे काही दिवस नियमितपणे सेवन केल्यास फरक दिसून येईल व कोरडा खोकला कमी होईल.

तुळशीची पाने

कोरड्या खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे सर्दी आणि फ्ल्यूची लक्षणेही कमी करण्यास उपयुक्त ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीची काही पाने मधासोबत खावीत. यामुळे तुमचा खोकला खूप कमी होईल.

हे सुद्धा वाचा

काळी मिरी व मीठ

कोरडा खोकला दूर करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे काळी मिरी आणि मीठ यांचे सेवन करणे. त्यासाठी एका भांड्यात कुटलेली किंवा पावडर केलेली काळी मिरी घ्या आणि त्यात थोडेसे मीठ घाला. नंतर त्यामध्ये थोडा मधही घालावा. झोपण्यापूर्वी नियमितपणे या मिश्रणाचे सेवन केल्यास रात्री कोरडा खोकला येत नाही.

गरम पाणी व मध

गरम पाण्यात मध मिसळून प्यायल्याने रात्री येणारा कोरडा खोकला तर दूर होतोच. पण गरम पाण्यामुळे घशाला शेक मिळून घशाच्या अनेक समस्याही दूर होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात थोडा मध मिसळून त्याचे सेवन करावे. त्याने खोकला कमी होईल.

(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.