AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ADHD Disorder: मुलांना काही करावेसे वाटत नाही.. कोणत्याही कामात मन लागत नाही; आताच व्हा सतर्क! ‘या’ मानसिक आजाराचे आहे लक्षण!

तुमच्या मुलाचे कोणत्याही कामात मन लागत नाही. सतत त्याचे लक्ष विचीलीत होते. त्यांना काही आठवत नाही. अशी लक्षणे तुमच्याही मुलांमध्ये दिसत असतील तर, वेळीच सावध व्हा. कारण हे एका मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. जाणून घ्या काय आहे हा आजार.

ADHD Disorder: मुलांना काही करावेसे वाटत नाही.. कोणत्याही कामात मन लागत नाही; आताच व्हा सतर्क! ‘या’ मानसिक आजाराचे आहे लक्षण!
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 09, 2022 | 12:24 AM
Share

मुंबईः जर तुमचे मूल कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नसेल आणि क्षणार्धात त्याच्या वागण्यात बदल (Behavior change) होत असेल तर सावध व्हा. कारण हे लहान मुलांच्या मानसिक विकाराचे लक्षण (Symptoms of mental disorder) आहे. या आजाराला एडीएचडी डिसऑर्डर म्हणतात. ‘अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर’, सहसा अनुवांशिक कारणांमुळे उद्भवते. यामुळे पीडित मुले कोणतेही काम नीट करू शकत नाहीत, त्यांना एकाग्र होण्यास त्रास होतो. त्याला काही सहज आठवत नाही. लहानपणी मेंदूला इजा झाली तरी हा आजार होण्याची शक्यता असते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे (What psychiatrists say) आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलाच्या वागणुकीत काही बदल होत असतील तर त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगभरात 6 दशलक्षाहून अधिक मुले ADHD ग्रस्त आहेत. 1990 पासून या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.

मुलांच्या हालचालीकडे लक्ष दया

ADHD ही समस्या 12 वर्षांखालील मुलांमध्ये अधिक दिसून येते. DHD साठी कोणताही विहित उपचार नाही. त्याची लक्षणे औषधांद्वारे कमी केली जातात. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजकुमार यांच्या मते, लहान मुलांमधील मानसिक समस्या सहज लक्षात येत नाहीत. अनेक वेळा पालक मुलांच्या वागणुकीतील बदलाकडे दुर्लक्ष करतात. पण असे न करता, मुलांच्या हालचालीक़डे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. आजार टाळण्यासाठी हे करा

हा आजार टाळण्यासाठी पालकांनी मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवणे आवश्यक आहे. त्यांना फोन किंवा गेम्सचे व्यसन होऊ देऊ नका. मुलांना बाहेर खेळायला घेऊन जा आणि मुलांच्या वागण्यात काही बदल झाला असेल तर त्यांना रागवू नका. शांत मनाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

गर्भधारणेदरम्यान देखील समस्या उद्भवू शकतात

डॉ.च्या मते, लहानपणीच बाळाच्या डोक्याला दुखापत झाली किंवा गर्भधारणेदरम्यान मुलाचा मानसिक विकास खुंटला तर त्रास होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन देखील टाळले पाहिजे. मुलाच्या जन्मानंतर सर्व चाचण्या करा. मुलामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दिसल्यास विलंब न करता उपचार करा. वेळेवर उपचार घेतल्यास रोगाची लक्षणे कमी करता येतात. एडीएचडीने ग्रस्त मुलांच्या पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं