AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायांनो इकडे लक्ष द्या ! तिशीनंतर ‘या’ टेस्ट करूनच घ्या, अनेक आजांरापासून होईल बचाव

वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये अनेक आजांराची रिस्क वाढते. मात्र वेळेवर टेस्ट्स करून घेतल्या तर त्या आजारांची ओळख सहजपणे होऊन उपचार करणे शक्य होते. महिलांनी कोणत्या टेस्ट करून घेणे महत्वाचे ठरते, ते जाणून घेऊया.

बायांनो इकडे लक्ष द्या ! तिशीनंतर 'या' टेस्ट करूनच घ्या, अनेक आजांरापासून होईल बचाव
| Updated on: Jun 24, 2023 | 1:50 PM
Share

Health tests for women : आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची झालेली आहे. आजारांशी लढायचं असेल तर चांगली व निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः महिलांसाठी हे खूप महत्वाचे आहे. कारण घरकाम आणि ऑफीसमधील जबाबदाऱ्या यामध्ये महिलांचे त्यांच्या तब्येतीकडे (woman health) दुर्लक्ष होते आणि नंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत अनेक आजारांचा धोका असतो. पण काही चाचण्या (important tests) आहेत ज्याद्वारे महिलांमध्ये होणारे काही प्रमुख आजार ओळखता येतात.

डॉक्टरांच्या सांगणायानुसार, ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने काही चाचण्या करणे आवश्यक असते. त्यामुळे आजाराची योग्य वेळेत ओळख पटते व त्यावर उपाय करणेही सोपे होते. दरवर्षी एकदा तरी या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.

ब्रेस्ट व सर्व्हायकल कॅन्सर टेस्ट

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचा (गर्भाशयाच्या मुखाचा) धोका सर्वाधिक असतो. वयाच्या ३० व्या वर्षांनंतर हे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी प्रत्येक महिलेने वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा तरी स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. ब्रेस्ट कॅन्सर तपासण्यासाठी मॅमोग्राफी करता येते. तर सर्व्हायकल कॅन्सर साठी पॅप स्मीअर ही चाचणी करता येऊ शकते.

डॉक्टरांशी योग्य सल्ला-मसलत करून या चाचण्या करून घ्याव्यात.

थायरॉईइड टेस्ट

वाढत्या वयानुसार महिलांमध्ये थायरॉईडचा धोकाही वाढतो. थायरॉईड वाढलाय किंवा घटलाय हे जाणून घेण्यासाठी थायरॉईड प्रोफाइल चाचणी केली जाऊ शकते. वर्षातून एकदा तरी ही चाचणी करणे हे प्रत्येक महिलेसाठी आवश्यक आहे. वेळीच चाचणी केल्यावर आजाराचे निदान झाले तर हा आजार आटोक्यात आणता येतो आणि गंभीर परिस्थिती उद्भवण्यापासून टाळता येते.

सीबीसी टेस्ट

वयाच्या तिशीनतर प्रत्येक महिलेने सीबीसी टेस्ट करून घेणेही महत्वाचे ठरते. या टेस्टद्वारे प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि हिमोग्लोबिन लेव्हल किती आहे, याची माहिती कळू शकते. या टेस्टशिवाय महिलांनी व्हिटॅमिनची चाचणी देखील केली पाहिजे. आजकाल बहुतांश महिलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 ची खूप कमतरता असल्याचे आढळून येते. त्यामुळे त्या संदर्भातील चाचण्याही वेळीच करून घेतल्या पाहिजेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....