मास्क, सॅनिटायझरचा वापर पुन्हा सुरू; चीनमध्ये कोरोनाचा कहर होताच कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?; जाणून घ्या एका क्लिकवर

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, सध्या कोणतीही गाईडलाईन जारी केली नाही. मात्र, लोकांना अलर्ट राहून नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मास्क, सॅनिटायझरचा वापर पुन्हा सुरू; चीनमध्ये कोरोनाचा कहर होताच कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?; जाणून घ्या एका क्लिकवर
मास्क, सॅनिटायझरचा वापर पुन्हा सुरू; चीनमध्ये कोरोनाचा कहर होताच कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 8:05 AM

नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोनाचा प्रचंड प्रकोप वााढला आहे. त्यामुळे चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसे न् दिवस वाढत आहे. चीनमध्ये उडालेल्या या हाहाकारामुळे भारत सरकार अॅलर्ट झालं आहे. देशातील सर्वच राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तसेच कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय पातळीपासून ते राज्य स्तरावर उच्च स्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दुसरीकडे दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, ओडिशामध्येही बैठका झाल्या आणि या राज्यांनी काही सूचनाही जारी केल्या आहेत.

सर्वच राज्यांनी कोरोना रोखण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग वाढवली आहे. लोकांना कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच मास्क अनिवार्य करण्यात आलं असून टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. कोणत्या राज्याने काय तयारी केलीय त्याचा घेतलेला हा आढावा.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत एकही केस नाही

कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचा संसर्ग वाढला तर त्याला रोखण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. दिल्लीत आतापर्यंत BF.7 व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सर्व प्रकरणात जिनोम सिक्वेसिंग केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

दिल्लीत रोज 2500 टेस्ट केल्या जात आहेत. गरज पडली तर रोज एक लाख टेस्ट करण्याची आपली क्षमता आहे. 8 हजार कोव्हिड बेड रिझर्व्ह आहेत. तर 36 हजार कोव्हिड बेड रिझर्व्हड करण्याची गरज आहे. ऑक्सिजन स्टोर करण्यात आलं आहे. एकूण 6 हजार सिलिंडर तयार आहेत. 380 रुग्णवाहिकाही तयार आहेत. आम्ही केंद्र सरकारच्या गाईडलाईनची वाट पाहत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत 24 टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. इतरांनीही बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी मास्क

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना परिस्थिती आणि आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे नागरिकांना आदेश दिले. तसेच नव्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग करणअयात येणार आहे. तसेच व्हॅक्सिनचे डोस वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासात एकही रुग्ण आढळलेला नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, सतर्कता बाळगावी, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच ताजमहल बघण्यासाठी आलेल्या पर्यटाकंची कोविड चाचणी करण्यात येत आहेत.

उत्तराखंडात बुस्टर डोसचं अभियान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून उत्तराखंडात बुस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. जिनोम सिक्वेसिंगवरही भर देण्यात येणार आहे. प्रत्येकाला बुस्टर डोस मिळावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रुम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहेत.

कर्नाटकात मास्क अनिवार्य

कर्नाटकात सर्व बंदिस्त जागी आणि वातानुकुलित ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. इन्फ्लूएंजा आणि श्वसनाचे विकार असलेल्यांची कोविड टेस्ट सक्तीची करणअयात येणार असल्याचं कर्नाटकाचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी सांगितलं.

रोज दोन ते चार हजार लोकांची कोविड चाचणी करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. तूर्तास राज्यात मास स्क्रिनिंगची काहीच गरज नसल्याचंही सुधाकर यांनी सांगितलं.

चिंता नाही, पण अलर्ट राहा, केरळ सरकारचं फर्मान

केरळ सरकारने राज्यातील जनतेला अलर्ट केलं आहे. राज्यात सध्या चिंतेचं वातावरण नाही. पण लोकांनी सतर्क राहावं. राज्यातील 100 टक्के लोकांना व्हॅक्सिन लावण्यात आळी आहे, असं केरळचे आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी सांगितलं.

हिमाचलमध्ये आजपासून फ्रि बुस्टर डोस

हिमाचल प्रदेशात दीन दयाल उपाध्याय रुग्णालय आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजता आजपासून 28 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत 18 वर्ष आणि त्यावरील अधिक वयाच्या लोकांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात जिल्हा तिथे नोडल ऑफिसर

गेल्यावेळी महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक कहर होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या राज्यात 132 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 22 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची जिनोम सिक्वेसिंग करण्यात येत आहे. तसेच कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घ्यावी. सतर्कता बाळगावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

पंजाब, ओडिशात कमी प्रभाव

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, सध्या कोणतीही गाईडलाईन जारी केली नाही. मात्र, लोकांना अलर्ट राहून नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशा सरकारनेही कोरोना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. ओडिशात जिनोम सिक्वेसिंग करण्यात येणार आहे. तसेच सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट.
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद.
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?.
खान्देशी गाण्यांवर झुंबा... ZP शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल
खान्देशी गाण्यांवर झुंबा... ZP शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल.
भिवंडीत पावसाची संततधार, 'या' भागात गुडघाभर पाणी अन् रस्त्याची नदी
भिवंडीत पावसाची संततधार, 'या' भागात गुडघाभर पाणी अन् रस्त्याची नदी.
कलेक्टरिन बाईंची खोटे प्रमाणपत्र देऊन नियुक्ती? IAS पूजा खेडकर कोंडीत?
कलेक्टरिन बाईंची खोटे प्रमाणपत्र देऊन नियुक्ती? IAS पूजा खेडकर कोंडीत?.
विधानसभेत मविआची सत्ता येणार? काय सांगतो सर्व्हे? मतदारांची पसंती काय?
विधानसभेत मविआची सत्ता येणार? काय सांगतो सर्व्हे? मतदारांची पसंती काय?.
क्रॉस व्होटिंग, फुटलेल्या 'त्या' 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं?
क्रॉस व्होटिंग, फुटलेल्या 'त्या' 7 आमदारांना काँग्रेसनं कसं पकडलं?.