व्हीटामिन्सचा अतिरिक्त मारा, फायद्यापेक्षा तोटाच अधिक, जडू शकतात या व्याधी

कोरोनाकाळात प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हीटामिन्स आणि सप्लीमेंटच्या ऑनलाईन खरेदीची आपल्याला सवय लागली आहे. परंतू डॉक्टरांचा सल्ला न घेता ती सेवन करणे धोकादायक आहे.

व्हीटामिन्सचा अतिरिक्त मारा, फायद्यापेक्षा तोटाच अधिक, जडू शकतात या व्याधी
supplementsImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 3:04 PM

दिल्ली : हल्ली जो तो आपल्या प्रकृती विषयी सजग होत असून तब्येत फिट ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाला अधिक वेळ देण्यापेक्षा झटपट शॉर्टकटने व्हीटामिन्स ( vitamins ) आणि सप्लीमेंट खाण्याला प्राधान्य देत आहे. परंतू अशा प्रकारे कोणतीही माहिती न घेता असा वारेमाप व्हीटामिन्स आणि सप्लीमेंटच्या वापराने आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. तरीही जगभरात लोक व्हीटामिन्स आणि सप्लीमेंटची ( supplement ) खरेदी मोठ्या प्रमाणावर करीत असून त्याचे मार्केट (MARKET ) वाढतच आहे. साल 2020 मध्ये कंप्लीमेंटरी आणि पर्यायी औषधांच्या ( ज्यात अनेक विटामिन्सवाल्या सप्लीमेंटचा समावेश आहे  जागतिक बाजारपेठेचे मूल्य सुमारे 82.27 अब्ज अमेरिकन डॉलर एवढे झाले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ विटरवॉटर्सरेंड आणि क्वाजुलू-नटाल  युनिव्हर्सिटीने यांनी केलेल्या एका अभ्यासात व्हीटामिन्स आणि सप्लीमेंटच्या वापराने आरोग्याचे नुकसान होते असे म्हटले आहे. अलीकडे आरोग्याशी संबंधीत औषधे जसे मिनरल आणि अमिनो एसिडचा वापर वाढत आहे. अभ्यासानूसार कोरोना काळानंतर लोक प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी विटामिन्स, सी, डी आणि झिंक सप्लीमेंट सहज बाजारात खरेदी करीत आहेत. परंतू याचा प्रभाव कितपत होतो याबाबत अजूनही सांशकताच आहे. ग्राहकांना मल्टी व्हीटामिन्स आणि मिनरल सप्लीमेंट सहज विकत मिळत आहेत. व्हीटामिन्स आणि मिनरल यांना समग्र रूपात सुक्ष्म पोषक तत्व ( मायक्रोन्यूट्रीएंट ) म्हटले जाते. आणि शरीराच्या संचलनासाठी काही पोषक तत्वाची गरज असते.

आपले शरीर कमी प्रमाणात हे मायक्रोन्यूट्रीएंट उत्पादीत करू शकते. किंवा अजिबातही करू शकत नाही. त्यामुळे आपण अन्नाद्वारे पोषक तत्वे घेतो. अशी सामान्य धारणा आहे की पुरक आहार किंवा सप्लीमेंट काही नुकसान करीत नाहीत. मात्र त्याचा अयोग्य प्रमाणात सेवण करणे खतरनाक साबित होऊ शकते. व्हीटामिन्स तेव्हाच फायदेकारक ठरतात, जेव्हा योग्य तज्ज्ञांमार्फत ठराविक प्रमाणात त्यांचे सेवन केले जाते. फॉलिक एसीड सप्लीमेंट गर्भवती महिलांच्या ‘न्यूरल ट्यूब’ ला खराब होण्यापासून वाचवते. जे लोक मासांहार कमी करतात किंवा साली असलेल्या डाळी खात नाहीत त्यांना विटामिन बी-6 सप्लीमेंटची गरज असते, इंट्रावेनस ( इंजेक्शन द्वारे नसामधून घेतले जाणारे ) विटामिन, पोषक तत्व आणि फार्मेसिया या तरल पदार्थांसोबत ब्युटी स्पा आणि आयव्ही बारमध्ये दिले जात असते.

ज्यांना अन्न गिळता येत अशा लोकांसाठी पहिले इंट्रावेनस पद्धतीचा उपचार केला जातो. इंट्रावेनस विटामिन चिकित्सेच्या फायद्याचे समर्थन करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. विटामिन्स ए रेटीनल डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. परंतू याचे प्रमाण ३००००० आयक्यू ( संख्या ) पेक्षा जास्त झाल्यास ते धोकदायक ठरते.

जास्त वेळेपर्यंत होणारे नुकसान म्हणजे ( हायपरविटामिनोसिस ) प्रतीदिन 10 हजार आयक्यू पेक्षा अधिक प्रमाणात जर सेवन केले तर लीव्हरला नुकसान होते. दृष्टी जाऊ शकते. आदी धोके त्यामुळे उद्बवतात. गर्भवती महीलांना मुलाच्या जन्मासंबंधी विकार होऊ शकतो. विटामिन्स बी-3 पचनासाठी लाभदायक आहे. परंतू याचे प्रमाण जास्त असेल तर लो ब्लड प्रेशर सह रक्तवाहीन्यांचे प्रसरण असे आजार होऊ शकतात. विटामिन्स बी -6 मुळे मेंदूचा विकास तसेच रोगप्रतिकारकता वाढते. परंतू त्याच्या प्रतीदिन 200 ग्रॅम सेवनाने पेरीफेरल पेशींचे नुकसान होते.

व्हीटामिन्स सी एक एंटी ऑक्साईड असून त्यामुळे शरीरातील उतींते नुकसान भरून निघते. परंतू त्याच्या अधिक प्रमाणाने किडनी स्टोन होऊ शकतो. विटामिन्स डी मुळे हाडे आणि दांताचा विकास होतो. परंतू त्यांचे प्रमाण जर जास्त झाले तर हायपरकॅलकेमिया ( रक्तात कॅल्सियमचे प्रमाण वाढणे ) होऊ शकतो. ज्यामुळे जादा तहान लहान लागणे तसेच अधिक प्रमाणात लघवी होणे , तसेच कोमात जाण्याबरोबर मृत्यूही ओढावू शकतो.

कॅल्सियम हाडांच्या विकासासाठी आवश्यक आहे. परंतू यामुळे बद्धकोष्टता आणि पोटासंबंधी विकार होऊ शकतात. यामुळे हायपरकॅल्शियुरिया ( मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण वाढणे ), किडनी स्टोन समस्या किंवा दुय्यम ‘हायपोपॅराथायरॉईडीझम’ (अंडरएक्टिव्ह पॅराथायरॉइड ग्रंथी कमी क्रियाशील होणे ) ही समस्या होते. व्हिटॅमिन डी ओव्हरडोसमुळे झिंक, मॅग्नेशियम आणि लोह यांच्याशी औषधांची रिअॅक्शन होऊ शकते.

मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्य वाढविण्यास चांगले परंतू त्याच्या अतिवापराने डायरीया, पोटदुखी आदी समस्या होतात. टेट्रासायक्लीन या प्रतिजैविकाशी त्याची रिअॅक्शन होते. चव आणि वास घेण्याची क्षमता वाढण्यासाठी झिंक महत्वाचे आहे, परंतु दररोज 80 मिलीग्रामपेक्षा जास्त सेवन केल्यास प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. दररोज 100 ते 200 मिलीग्राम लोहाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, चेहरा काळवंडणे आणि दात काळे पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.