AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teeth | या 4 गोष्टींमुळे दातांमध्ये पिवळेपणा येतो, हे पदार्थ खाण्याच्या अगोदर नक्कीच विचार करा!

आपल्या सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो. मात्र, जर सतत चहा आपण घेत राहिलो तर त्याचा आपल्या दातांवर परिणाम होतो. काही लोकांना चहाचे व्यसन असते. ते दिवसातून अनेक वेळा चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडतात. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी पिण्याची सवय लावा. हे तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल.

Teeth | या 4 गोष्टींमुळे दातांमध्ये पिवळेपणा येतो, हे पदार्थ खाण्याच्या अगोदर नक्कीच विचार करा!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 1:26 PM
Share

मुंबई : आपण लहानपणापासूनच ऐकतो की, काहीही खाल्ले तरीही चूळ ही भरली पाहिजे. ज्यामुळे आपले दात (Teeth) चांगले राहण्यास मदत होते. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाहीत. ज्यामुळे विशेष: दातांच्या समस्या (Problem) निर्माण होतात. दातांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे. दातांचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. दातांमध्ये पिवळेपणा हे केवळ आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि दात व्यवस्थित न साफ ​​केल्यामुळे होत नाही. दात पिवळे करणाऱ्या अनेक गोष्टी असतात, त्यामुळे ते खाताना आपण खूप काळजी (Care) घेतली पाहिजे. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.

चहा

आपल्या सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो. मात्र, जर सतत चहा आपण घेत राहिलो तर त्याचा आपल्या दातांवर परिणाम होतो. काही लोकांना चहाचे व्यसन असते. ते दिवसातून अनेक वेळा चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडतात. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी पिण्याची सवय लावा. हे तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल.

ब्लॅक कॉफी

आजकाल अनेकांना ब्लॅक कॉफी प्यायला प्रचंड आवडते. त्याचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत. ब्लॅक कॉफीमुळे तुमचे दात पिवळे देखील होतात. तुम्हालाही ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असेल तर आजपासूनच त्यावर नियंत्रण ठेवा. जर आपण यावर नियंत्रण ठेवले नाहीतर आपले दात जास्त पिवळे होत जातात.

सोया सॉस

चायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्‍या सोया सॉसमुळे देखील दातांमध्ये पिवळसरपणा येतो. जरी काहीवेळा ते एखाद्या गोष्टीत घातल्याने समस्या उद्भवत नाहीत. पण जर तुम्ही वारंवार गोष्टींमध्ये याचा वापर केला तर समस्या उद्भवू शकतात. यामुळे सोया सॉस जास्त प्रमाणात खाणे टाळाच.

तंबाखू

तंबाखू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तंबाखू चघळल्याने दातांमध्ये आधी पिवळेपणा येतो आणि नंतर काळेपणा येतो. जर तुम्ही ते सिगारेटच्या रूपात घेतले तर ते तुमच्या दातांसोबत तुमचे ओठही काळे करते, ते पूर्णपणे टाळा. जर आपण हे वेळीच टाळले पाहिजे समस्या अधिक होईल.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा