Nutrition Security | खाद्य विज्ञानामुळे पोषण सुनिश्चिततेला बळकटी? जाणून घेऊया तज्ज्ञांच्या नजरेतून-

Nutrition Security | खाद्य विज्ञानामुळे पोषण सुनिश्चिततेला बळकटी? जाणून घेऊया तज्ज्ञांच्या नजरेतून-
पोषण सुनिश्चिततेला बळकटी
Image Credit source: टीव्ही 9

भारताच्या अन्न उत्पादनाच्या दृष्टीने खाद्य विज्ञानानं नासाडी आणि खराब होणे या महत्वाच्या समस्या असल्याचं म्हटलं आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्याची अकार्यक्षम हाताळणी, साठवणूक आणि वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन वाया जाते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

May 13, 2022 | 2:46 PM

भारताची पोषण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि प्रथिन संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी खाद्य विज्ञान आजमितीला भारतासाठी वरदान ठरत आहे. बलाढ्य लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नावीण्यतेचा खाद्य प्रक्रियेत वापर करण्याद्वारे कृषी उत्पादकतेत मोठी क्रांती दिसून येत आहे. उत्पादकतेपेक्षा अन्नाची प्रथिन गुणवत्ता ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आयआयटी खरगपूरचे खाद्य तंत्रज्ञानाचे प्राध्यापक हरी निवास मिश्रा यांनी खाद्य उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करण्याऐवजी खाद्य गुणवत्ता वाढीवर भर द्यायला हवे असे म्हटले आहे.

संशोधन आणि विकास क्षमतेच्या सर्वांगीण विकासामुळे खाद्य निर्मितीच्या स्वयंपूर्णतेच्या स्तरावर पोहोचलो आहोत. यापूर्वी आपल्या संशोधन व विकासाची दिशा अन्न उत्पादन वाढविण्याच्या दिशेने केंद्रित होती. मात्र, स्वयंपूर्णतेच्या स्तरावर पोहोचल्यावर अन्न दर्जावाढीवर लक्ष्य केंद्रित करुन निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रा. मिश्रा पुढे बोलताना म्हणाले.

पौष्टिक गुणवत्ता सुधारणे म्हणजे भारतीय आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या पोषक घटकांचा अंतर्भाव करणे. प्रक्रियायुक्त अन्न आणि जनुकीय सुधारित अन्नामुळे भारतात प्रथिनांच्या स्वयंपूर्णतेचा मार्ग प्रशस्त होतो. परंतु किफायतशीर प्रमाणात अपेक्षित लोकसंख्येला अन्न धान्यांचा पुरवठा करणे हे उद्दिष्ट आहे.

पाहा व्हिडीओ :

प्राध्यापक दीपक पेंटल यांच्या मते जनुकीय तज्ञ आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांच्या मते, “सोयाबीन हे माणसासाठी तसेच पोल्ट्री उद्योगासाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. आजच्या घडीला मध्यम आणि उच्च-मध्यमवर्गीय वर्ग प्रक्रियायुक्त अन्न पदार्थाचे सेवन करतात. मात्र, पोषक आहाराची आवश्यकता असलेला बहुसंख्य वर्ग अद्यापही पोषणयुक्त आहारापासून वंचित आहे. अन्नप्रक्रियेबद्दल विस्ताराने चर्चा होत असताना आपल्या देशाची प्रथिनांची गरज भागवण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सोयाबीनचा प्रभावीपणे वापर करू शकलो नाही.

“आजमितीला मध्य भारतात 10-11 दशलक्ष हेक्टरमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु सध्याची उत्पादकता 1 टन प्रति हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. दोन टन प्रति हेक्टरपर्यंत वाढविण्याचे कृषी शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन प्रा. पेंटल यांनी पोषण सुरक्षा गाठण्यासाठी पीक उत्पादकता आणि खाद्य विज्ञानाचं महत्व विशद करताना महत्व व्यक्त केलं. यावरून असे सूचित होते की खाद्य विज्ञानाचे केवळ खाद्यपदार्थांच्या बळकटीकरणात सहाय्य ठरत नाही तर भारतीय आहारांमध्ये कमी असलेल्या पोषक स्रोतांचे उत्पादन वाढवण्याचे मार्ग देखील शोधू शकतात.

भारताच्या अन्न उत्पादनाच्या दृष्टीने खाद्य विज्ञानानं नासाडी आणि खराब होणे या महत्वाच्या समस्या असल्याचं म्हटलं आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्याची अकार्यक्षम हाताळणी, साठवणूक आणि वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन वाया जाते. प्रा. मिश्रा यांनी अन्नाची उपलब्धता वाढवण्यासाठी कापणीनंतरच्या टप्प्यात होणारे नुकसान कमी करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली आहे.

“आजही 15-20 टक्के धान्याची नासाडी होते. 35-40 टक्क्यांपर्यंत नासाडीची टक्केवारी पोहोचलेल्या नाशवंत खाद्यपदार्थांचे प्रमाण अधिक ठरते. त्यामुळे कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानावर भर देत आहोत. त्यामुळे अन्नाची उपलब्धता वाढेल आणि गुणवत्तेतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे प्रा.मिश्रा यांनी म्हटलं आहे.

अन्न विज्ञान तत्त्वे आणि संबंधित नवकल्पनांवर आधारित अन्न प्रक्रिया या देखील खाद्यपदार्थांचे आयुष्य, सुरक्षितता आणि पोषणमूल्ये ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत वाढविण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल ठरतात. देशातील सर्वात मोठा प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ असलेल्या दुधाच्या उत्पादनाची यशोगाथा अन्य अन्न क्षेत्रात पुनरावृत्ती करण्यात भारत अपयशी ठरला असल्याचे मत राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेचे (NIFTEM) प्राध्यापक आशुतोष उपाध्याय यांनी व्यक्त केलं आहे.

थायलंडसारख्या सीमावर्ती राष्ट्रामध्ये भारताच्या तुलनेत उत्पादित होणाऱ्या ताजी फळे आणि भाज्यांपैकी सुमारे 4-5 पट अन्नप्रक्रिया होते. श्वेतक्रांतीनंतर दूध उत्पादन आणि प्रक्रियेची संपूर्ण रचना निर्माण झाली. दुग्धोत्पादन, संकलन आणि केंद्रांवर प्रक्रिया करण्याच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी शीतकरण यापासून एक परिभाषित पुरवठा साखळी आहे. ग्राहकांना सुरक्षित दूध देण्यासाठी शीतकरण अत्यंत महत्त्वाचे आहे हे देखील दूध प्रक्रियेच्या यशामागील एक कारण आहे. याप्रमाणेच फळे आणि भाज्यांच्या संघटित प्रक्रियेमुळे फळे आणि भाज्यांची सुरक्षितता ग्राहकांपर्यंत पोहोचू शकल्याचे मत प्रा. उपाध्याय यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्राध्यापक उपाध्याय यांनी जीवनशैलीतील बदलामुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जाण्याची आशा व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त, सरकारी तसेच खासगी घटकांच्या पुढाकारामुळे भारतात प्रक्रिया पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. जनुकीय सुधारित अन्न स्वीकारण्याच्या बाबतीत प्रा.उपाध्याय यांनी नुकीय सुधारित खाद्यपदार्थ जगाच्या इतर भागांप्रमाणे भारतीय बाजारपेठेसाठी स्वीकार्य असतील. हे पोषण सुरक्षेसाठी देखील उपयुक्त असू शकते असं निरीक्षण नोंदविलं आहे.

हे सुद्धा वाचा

“आजमितीला स्टार्टअप संस्कृती देशातील अन्न प्रक्रियेला चालना देत आहे. ग्राहकांच्या स्वीकार्यतेतील अडथळे आणि खाद्यपदार्थांची प्रक्रिया आणि पौष्टिक सुदृढीकरणच्या बळकटीकरणासाठी योग्य तांत्रिक पायाभूत सुविधांच्या अभावावर मात करण्यास मदत करतील असे मत प्रा. उपाध्याय यांनी व्यक्त केलं आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें