AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feeding the Future | शून्य उपासमारीचे लक्ष्य गाठण्यात ‘जीएम’ पिकांची महत्वाची भूमिका  

गरीब आणि विकसनशील देशांना त्यांच्या पोषण आव्हानांना तोंड देण्यासाठी GM पिकांची जास्त गरज असूनही, या राष्ट्रांमध्ये या नवीन तंत्रज्ञानाचा किंवा GM बियाण्यांचा अवलंब होतांना दिसत नाही.

Feeding the Future | शून्य उपासमारीचे लक्ष्य गाठण्यात ‘जीएम’ पिकांची महत्वाची भूमिका  
शून्य उपासमारीचे लक्ष्यImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 13, 2022 | 2:43 PM
Share

उपासमारी किंवा भूक हे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे हे भविष्यात तीव्र होऊ शकते. युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये 2.37 अब्ज लोक अन्नाशिवाय किंवा नियमितपणे निरोगी संतुलित आहार घेण्यास असमर्थ होते. गंमत म्हणजे, जागतिक स्तरावर अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होऊनही उपासमारीने ग्रस्त लोकसंख्येचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत, जनुकीय सुधारित (GM) पिके 2030 पर्यंत शून्य उपासमारीचे लक्ष्य साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

कुपोषणाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी प्रभावी

‘जीएम पिके’ ही अशी वनस्पती आहेत ज्यात अधिक चांगले उत्पादन आणि अधिक कीटक प्रतिरोधक गुणधर्मांसाठी अनुवांशिक अभियांत्रिकीद्वारे बदल केले गेले आहेत. हे शेतकऱ्यांना चांगली उत्पादने मिळविण्यात तसेच स्थानिक आणि हंगामी पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यास मदत करते. काही GM पिके पोषण, जीवनसत्त्वे आणि खनिजे वाढवण्यासाठी देखील तयार केलेली असतात, ज्यामुळे मुलांमधील कुपोषण आणि वाढत्या समस्यांवर मात करता येते. भारतातही, जीएम पिके कुपोषणाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. अलीकडे, एका माहिती अधिकार कायदयाअंतर्गत उपस्थित केलेल्या प्रश्नात, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने उघड केले की भारतातील 33 लाखांहून अधिक मुले कुपोषित आहेत आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक गंभीर श्रेणीत येतात. यावर व्यक्त होतांना तज्ज्ञांनी, उच्च दर्जाचे, पौष्टिक अन्नाचे उत्पादन करण्यासाठी भारताने बदलत्या तंत्रज्ञानाचा व्यापकपणे अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले आहे.

पाहा व्हिडीओ :

अन्नात पोषण घटकांचा समावेश 

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचे माजी संचालक आणि एक प्रख्यात वनस्पती जैवतंत्रज्ञ प्रा. के.सी. बन्सल  यांच्या मते, “गेल्या 25 वर्षांपासून आपण आपल्या अन्नाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पारंपारिक पद्धती वापरत असताना, आजच्या काळात आपल्याला आपल्या अन्नामध्ये विशिष्ट खनिजे आणि पोषण जोडायचे असल्यास, आपण अनुवांशिक अभियांत्रिकी (जीएम तंत्रज्ञान) या विश्वसनीय तंत्रज्ञानाकडे वळू शकतो.  प्रथम अनुवांशिक अभियांत्रिकी पिके, किंवा GMOs, यूएसए मध्ये 1996 मध्ये लागवड करण्यात आली. ISAAA (International Service for the Acquisition of Agri-biotech Applications) नुसार 2019 मध्ये, 29 देशांमधील सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनी 190 लाख हेक्टरपेक्षा जास्त GM पिकांची लागवड केली होती. दरम्यान, जीएम बियाणे बहुतेक विकसित देशांतील मोठ्या कंपन्यांद्वारे उत्पादित केले जातात. परंतु, गरीब आणि विकसनशील देशांना त्यांच्या पोषण आव्हानांना तोंड देण्यासाठी GM पिकांची जास्त गरज असूनही, या राष्ट्रांमध्ये या नवीन तंत्रज्ञानाचा किंवा GM बियाण्यांचा अवलंब होतांना दिसत नाही. शिवाय, पर्यावरणावरील परिणाम, मूळ पिकांच्या वाणांची सुरक्षितता आणि आरोग्यविषयक समस्यांसह प्रतिबंधात्मक नियमांमुळे जीएम पिकांच्या व्यापक अवलंबनात अडथळा निर्माण होतो.

अनियमित हवामानात मर्यादित संसाधनात टिकाव धऱण्यास सक्षम 

प्रा. बन्सल सांगतात की, “सध्या, भारतातील बीटी कापसासह जगभरात सुमारे 15 जीएम अन्न पिके आहेत ज्यांचे व्यापारीकरण झाले आहे. जीएम तंत्रज्ञानासोबतच, भारताला जीनोम एडिटिंगसारख्या नवीन तंत्रज्ञानाचाही पूर्णपणे वापर करण्याची गरज आहे. एकत्रितपणे, या तंत्रज्ञानामुळे खाद्यपदार्थांचे पौष्टिक मूल्य अधिक प्रभावीपणे सुधारण्यास मदत होऊ शकते. जीएम पिके भारतातील शेतकऱ्यांना हवामान बदल आणि कमी होत चाललेल्या पाणी आणि जमिनीच्या स्त्रोतांमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. “हवामान बदलामुळे आपली जमीन आणि जलस्रोत कमी होत आहेत. त्यामुळे, जनुकीय बदलासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे पूर्वीपेक्षा आता आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे झाले आहे. जीएम तंत्रज्ञान अधिक लवचिक पिके तयार करण्यास मदत करीत असून, अनियमित हवामानातही कमी पाणी, माती व मर्यादित संसाधनात टिकाव धरण्यास सक्षम आहे. त्यामुळे आताच्या जिवनशैलीला सुटसे पौष्टीक अन्नपदार्थ तयार करण्यास जीएम पिके वरदान ठरू शकतात.

Follow Us
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार