
Baba Ramdev Tips : टाईप-1 प्रकारचा मधुमेह होण्याचे प्रमाण आजकाल चांगलेच वाढले आहे. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. हा आजार जडला की शरीरात इन्सुलीन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे शरीरातील साखर वाडथे. लहान मुले, किशोरवयीन मुले आणि तरुणांनाही टाईप-1 मधुमेह होत आहे. हा आजार होण्याआधी तुमचे शरीर काही संकेत देते. परंतु या लक्षणांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. योग्य काळजी घेतल्यास तुम्हाला तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात आणता येते. योग्य आहार, योगासने याच्या जोरावर हे शक्य असल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे.
टाईप-1 मधुमेह झाला की काही लक्षणं दिसायला लागतात. खूप तहाण लागणे, सतत लघवी येणे, शरीर थकून जाणे, अंधूक दिसायला लागणे, अशी काही यामागे प्रमुख लक्षणं आहेत. परंतु थोडीफार काळजी घेऊन तुम्हाला या मधुमेहावर विजय मिळवता येतो.
दरम्यान, रामदेव बाबा यांनी टाईप-1 मधुमेहावर विजय मिळवण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. आहारात टोमॅटो, टोमॅटोचा रस, काकडी, कारल्याचा ज्यूस याचा समावेश करावा. भोपळा, ब्रोकली, भएंडी, पालक, बिन्स यांचाही आहारात समावेश करावा. तुम्हाला मधुमेह असेल तर ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेले पदार्थ आहारातून काढून टाका. वेगवेगळ्या भाज्या, लीन प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रोसेस्ड फुड, चायनिज फुड, सॅच्यूरेटेड फॅट असलेले पदार्थ खाणे टाळायला हवेत, असे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे.
तसेच, टाईप-1 मधुमेह या आजारापासून मुक्त हवी असेल तर योगासनेही फायद्याचे असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे. मंडुकासन, मुद्रासन, पवनमुक्तास, उत्तानपादासन, वज्रासन, वक्रासन यासारखी 10 आसने रोज करावीत. यामुळे तुम्हाला फायदा होईल, असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे.
(टीप- या स्टोरीतून आम्ही कोणताही दावा केलेला नाही. कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)