दूधी भोपळा कोणत्या आजारांवर गुणकारी आहे पाहा ? बाबा रामदेव यांनी सांगितले चमत्कारी उपाय
Baba Ramdev Home Remedies: योगगुरु रामदेव बाबा आयुर्वेदिक उपाय सुचवतात. योगा शिवाय घरातही अनेक आजार आणि शारीरिक समस्यांतून सुटका कशी मिळवायची याचीही माहिती ते देत असतात. आता त्यांनी दूधी भोपळ्याचे फायदे सांगितले आहेत.

पतंजलीचे संस्थापक आणि योग गुरु बाबा रामदेव यांचे आयुर्वेदिक उपाय जगभरात प्रसिद्ध आहेत. रामदेव बाबा यांच्या दाव्यानुसार तर साठीमध्येही तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता परंतू यासाठी तुमचे रुटीन हेल्दी व्हायला हवे. रामदेव बाबा यांनी सांगितले की आरोग्यदायी राहण्यासाठी आहाराचे महत्व सर्वाधिक आहे.यासाठी लोक जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा सल्ला दिला आहे. एका व्हिडीओतून रामदेव बाबा यांनी दूधीचे महत्व सांगितले आहे. स्वामी रामदेव बाबांच्या मते दूधी भोपळा हा एकाच नव्हे तर अनेक आजारांचा काळ आहे. दूधी हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते बीपी कंट्रोल करण्यापर्यंत अनेक फायदे पोहचवू शकते.
रामदेव बाबाच्या मते दूधीत काय गुण आहेत आणि ती कोण-कोणत्या आजारांवर गुणकारी आहे हे आपण या आर्टिकलमधून वाचणार आहोत. दूधीत कोण-कोणते तत्व असतात. याशिवाय आपण कोणत्या प्रकारे दूधीचा समावेश डाएटमध्ये करु शकतो हे पाहूयात…
दूधीतील तत्व । Lauki nutrients per 100 gram
दूधी भोपळ्यात अनेक पोषक तत्वे असतात ही पोटासाठी सर्वात जास्त फायदेशीर मानली जाते. दूधी भोपळा पचायला अतिशय हलका असतो. १०० ग्रॅम दूधीत पाणी ९२९६ टक्के, कॅलरी १४१५, कार्बोहायड्रेट ३.५ ग्रॅम, फायबर ०.५१ ग्रॅम, प्रोटीन: ०.६ ग्रॅम असते. यात व्हिटामिन्स सी असते, त्यामुळे इम्युनिटी वाढते.
व्हिटामिन्स B कॉम्प्लेक्स,डोळ्यांसाठी गरजेचे असलेले व्हिटामिन A ( बीटा-कॅरोटीन),
पॉटेशियम : १७०१८० mg ( ब्लड प्रेशर नियंत्रण ),
कॅल्शियम : २०२६ mg ( हाडांना मजबूती देते ),
मॅग्नेशियम : १०११ mg ( स्नायूंसाठी ),
फॉस्फोरस: १२१३ mg,
आयर्न : ०.३०.४ mg ,
सोडियम : खूप कमी ( हार्ट फ्रेंडली ) सारखी तत्वे यात सामील असतात.
याशिवाय यात अनेक दुसरे एंटीऑक्सीडेंट्स आणि तत्वे असतात.
कोणत्या आजारात फायदेशीर ?
योग गुरु बाबा रामदेव यांच्या मते दूधीची भाजी अनेक आरोग्याच्या तक्रारी दूर करते. जर तुम्ही योग्य प्रमाणात दूधीचे सेवन केले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. यामुळे हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो. त्वचेच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर याने खाल्ल्याने फायदा मिळतो. किडनी आणि पोटाचे आजार देखील याने बरे होतात.
दूधी भोपाळ्यापासून तयार झालेले पदार्थ खा । different types of lauki dishes
साधी भाजी – जर तुम्ही दूधी भोपाळ्याची साधी भाजी बनवून खाल्ले तर फायदा होतो. कमी तेलात दूधीचे तुकडे भाजावेत आणि त्यात थोडे मसाले टाकावेत. यात व्हेट लॉस, एसिडिटी वा जळजळीपासून सुटका होते. तुम्ही प्रोटीनसाठी यात थोडे चणे टाकू शकता. ही भाजी प्रोटीन आणि फायबरचे बेस्ट कॉम्बिनेशन आहे.
दूधीचे सुप – थंडीत सुरु असेल आणि शरारात उष्णात राखण्यासाठी तुम्ही दूधीचे सूप पिऊ शकता. या फायबर भरपूर असते. हे हलके असल्याने सहज पचते. हा एक प्रकारे डिटॉक्स सूप असून त्यामुळे पोट आणि अन्य अवयवांना फायदा होतो. दूधीचे ज्यूस – काही वर्षांपासून पालेभाज्यांचे ज्यूस पिण्याचा ट्रेंड सरु आहे. यात कच्चा दूधीचा ज्यूस देखील सामील करु शकता. दूधी भोपळा किसून त्यास गाळावे. आणि रोज योग्य प्रमाणात प्यावे. यामुळे किडनी आणि लिव्हर डिटॉक्स होते. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहातो. आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.
