पतंजलीच्या श्वासारी वटीचे फायदे काय ? सेवन कसे करायचे ?
गेल्या काही वर्षात फुप्फुसाच्या आजाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. अस्थमा, सीओपीडी आणि ब्रोंकायटिस सारखे आजार वाढत आहेत. पतंजली आयुर्वेदीक औषध श्वासारि वटीने देखील फुप्फुसाच्या समस्येवर दिलासा मिळू शकतो.

गेल्या काही वर्षात प्रदुषणाची समस्या खूपच वाढली आहे. थंडीच्या हवामानात प्रदुषणाची पातळी खूपच वाढते. प्रदुषणाने अस्थमा, ब्रोकायटिस आणि सीओपीडी सारखे आजार देखील वाढले आहेत. फुप्फुसाचे इन्फेक्शन याचे कारण आहे. पतंजलीने फुप्फुसाच्या समस्यांसाठी एक औषध तयार केले आहे. याचे नाव श्वासारी वटी असे आहे. पतंजलीने दावा केला आहे की हे औषध फुप्फुसाचे इन्फेक्शन आणि आजारांवर रामबाण इलाज आहे.यास आयुर्वेदिक जडीबुटीने तयार केले आहे. यास खाल्ल्याने शरीरात कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.
श्वासारी वटीत संदर्भात पतंजलीने दावा केला आहे की फुप्फुसाची सफाई करणे आणि श्वासा संदर्भात समस्येत हे औषध आराम देऊ शकते. हे औषध ब्रॉन्कोडायलेटर सारखे काम करते. यामुळे लंग्स इन्फेक्शन देखील दूर होते. याच्या सेवनाने फुप्फुसाची क्षमता देखील चांगली होते. पतंजलीच्या मते या औषधाने काकदासिंगी,आल्याचे भस्म, मुलेठी, सुंठ आणि दालचिनी यांचा वापर करण्यात आला आहे. औषधात स्फटिक भस्म आणि अन्य जडीबुटींचा वापर केला आहे.
इम्यूनिटी मजबूत होते…
हे औषध शरीराची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते. यात लंग्समध्ये इंफेक्शन होण्याची रिस्क कमी होत असते. या औषधामुळे फुप्फुसातील बेडके, कफ आणि सूज कमी होते. ज्या लोकांना अस्थमा , ब्रोंकायटिस वा सीओपीडी सारखी समस्या असेल त्यांना देखील हे औषध आराम देऊ शकते असा दावा पतंजलीने केला आहे.
श्वासारी वटी कशी सेवन करायची ?
या वटीच्या एक गोळी सकाळी आणि रात्री जेवण्याच्या आधी घेऊ शकता. डोसचे प्रमाण रुग्णाचे आरोग्य आणि डॉक्टराच्या सल्ल्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही आधीच फुप्फुसासाठी कोणते औषध घेत असाल तर पतंजलीचे औषध आणखी पर्याय म्हणून घेऊ नये. यासाठी आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डोस बदलावा किंवा ट्रीटमेंटची पद्धत बदलावी. स्वत:च निर्णय घेऊ नये.
( Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यातील माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9 मराठी या दाव्यांना दुजोरा देत नाही.कोणतेही औषध घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा आधी सल्ला घ्यावा. )
