रोज 20-30 मिनिटे कपालभाती केल्याने दूर होतील हे आजार, रामदेवबाबांनी सांगितला उपाय
रामदेव बाबा यांनी योगाचा प्रसार घरोघरी केला आहे. ते नेहमी योग करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते योग करण्याने अनेक आजारातून सुटका मिळू शकते. आज आर्टीकलमध्ये तुम्हाला कपालभाती प्राणायम करण्याच्या फायदा सांगणार आहे.

आजच्या बदलल्या जीवनशैलीमुळे चुकीच्या आहारामुळे, तणाव आणि फिजिकल एक्टीव्हीटीच्या कमतरतेने लोक छोट्या-मोठ्या आजाराने त्रस्त असतात. मात्र, योगासने आणि प्राणायम केल्याने आपल्या दैनंदिन आरोग्यादायी होण्यास मदत मिळते. ही आसने सोपी आणि घरच्या घरी करता येणारी असतात. या संदर्भात योग गुरु रामदेव बाबा यांनी सांगितले की जर एखादी व्यक्ती रोज काही वेळ आपल्या शरीरासाठी देत असेल तर औषधे घेण्याची आवश्यकता कमी लागेल. योग गुरु रामदेव बाबा यांनी अनेक आसने सांगितली आहेत, जी आजारांना दूर ठेवतात. यात एक कपालभाती आसन महत्वाचे आहे.
जर तुम्ही सारखे आजारी पडत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आपण पाहूयात कपालभाती करण्याचा योग्य प्रकार काय आहे. तसेच या आसनाला रोज 20-30 मिनिटे केल्याने कोण-कोणते आजार दूर होऊ शकतात हे पाहूयात…
रोज करा कपालभाती प्राणायम
रामदेव बाबा यांनी नेहमीच आपल्या व्हिडीओत योगासन करण्याची पद्धत आणि याचे फायदे सांगितले आहे.एका व्हिडीओत रामदेव बाबांनी सांगितले की जर तुम्ही रोज २० ते ३० मिनिटे कपालभाती प्राणायम केले तरी शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होईल, त्यांच्या मते यास केल्याने शरीराची आतून सफाई होते आणि पचन यंत्रणा मजबूत होते. या प्राणायमने पोट, लिव्हर, स्वादुपिंड आणि आतड्यांवर थेट परिणाम होतो. ज्यामुळे शरीरात जमलेले टॉक्निंस बाहेर पडण्यास मदत होते.
कपालभाती आजार दूर पळतात
लठ्ठपणा – जर तुम्ही रोज कपालभाती प्राणायम करत असाल तर याने पोटाची चरबी कमी होते आणि वजन घटण्यास मदत मिळते. या प्राणायमला करताना वेगाने श्वास बाहेर टाकत पोट आतल्या बाजूला खेचावे लागते. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत होते. परंतू या आसनाला करता सोबत संतुलित आहार देखील घेणे गरजेचे असते.
डायबिटीज कंट्रोल – ब्लड शुगरला नियंत्रित करण्यासाठी कपालभाती असरदार मानली जाते. वास्तविक कपालभाती स्वादुपिंडच्या बिटा सेल्सना एक्टीव्ह करते.ज्यामुळे इन्सुलिनची संवेदना वाढते. आणि ब्लड शुगर बॅलन्स रहातो.
बद्धकोष्ठता आणि गॅस – कपालभाती प्राणायमने पचन यंत्रणा मजबूत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि एसिडीटीतून आराम मिळतो. कारण पोटाच्या स्नायूंना एक्टीव्ह करुन पचन अग्नि ( digestive fire) वाढवतो. पोट फुगणे आणि टॉक्सिंसला बाहेर काढते. त्यामुळे पचन यंत्रणा मजबूत होते आणि मैला त्यागण्यास सोपे होते.
फॅटी लिव्हर/ लिव्हरची समस्या – कपालभाती फॅटी लिव्हर आणि लिव्हरची समस्या कमी होते. कारण कपालभाती करत असाल तर मेटाबॉलिझ्म बूस्ट होतो. ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि शरीरातील टॉक्निंस बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

kapalbhati benefits
कपालभाती प्राणायाम करण्याचा प्रकार
कपालभाती प्राणायाम करण्यासाठी आधी जमीनीवर पाठ सरळ करुन बसावे. आता खोल श्वास घ्यावा, आणि पोटाला आत खेचावे नाकाने जोरात उच्चश्वास सोडवा. श्वास सोडताना पोटाला हलके.ज्यामुळे श्वास आपोआप आत जाईल. ही प्रक्रिया 20-25 वेळा करावी.
