AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांना कंडिशनर आणि सीरम लावताय? तर या दोघांमधील ‘हा’ फरक जाणून घ्या

आपण प्रत्येकजण हेअर केअर करताना केसांना कंडिशनर आणि सीरम लावतोच. तसेच हेअर केअरमध्ये या दोघांचीही स्वतःची वेगवेगळी भूमिका आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट तुमच्या केसांना मजबूत आणि मऊ करण्यास मदत करतात. पण या दोघांमध्ये थोडा फरक आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण कंडिशनर आणि सीरममध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया.

केसांना कंडिशनर आणि सीरम लावताय? तर या दोघांमधील 'हा' फरक जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 4:55 PM
Share

वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर त्वचेच्या समस्या देखील सतावत असतात. अशातच यांचा परिणाम केसांवर सुद्धा होत असतो. त्यामुळे आजकाल बहुतेकजण केस गळण्याच्या समस्यांना त्रासलेले आहेत. यासर्वांमध्ये प्रत्येकालाच आपली केसं दाट आणि मऊ राहावेत असे वाटते. यासाठी लोकं खूप प्रयत्न करतात. ते सर्वात महागडे केसांची निगा राखणारे उत्पादने आणि घरगुती उपचारांचा अवलंब करतात. त्यातच बरेच लोकं अनेक प्रकारच्या हेअर केअर प्रॉडक्ट वापरून केसांवर उपचार घेतात. यामध्ये कंडिशनर आणि सीरमचा वापर सर्वाधिक केला जातो. केस धुतल्यानंतर लोकं या गोष्टी वापरतात.

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी फक्त शाम्पू करणे पुरेसे नाही, तर त्यानंतरची काळजी म्हणजेच “कंडिशनिंग” आणि “सीरम” लावणे देखील खूप महत्वाचे आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट केस मजबूत, मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. पण या दोघांमध्ये थोडा फरक आहे. त्याबद्दल आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत…

कंडिशनर

कंडिशनर हे एक क्रीम किंवा लोशनसारखे केसांचे प्रॉडक्ट आहे जे शॅम्पू केल्यानंतर केसांना लावले जाते. शाम्पू लावल्याने तुमचे केस स्वच्छ होतात, पण त्यामुळे नैसर्गिक तेलही निघून जाते. ज्यामुळे तुमचे केस कोरडे आणि फ्रिजी होतात. अशा वेळेस केसांची ही समस्या सतावू नये यासाठी शाम्पू नंतर कंडिशनर लावल्याने केस मऊ, गुळगुळीत होण्यास मदत होते. कंडिशनर केसांच्या वरच्या थराला कोट करते, त्यामुळे तुमचे केस मऊ व सिल्की होतात.

त्यात कंडिशनर केल्याने केस कमी गुंतात. त्याचबरोबर कंडिशनर लावल्याने शाम्पू केल्यानंतर गमावलेला ओलावा परत आणण्यास मदत करतो. कंडिशनर हे तीव्र सुर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण आणि हीटिंग टूल्सच्या दुष्परिणामांपासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करते. शॅम्पू केल्यानंतर केसांमधून जास्तीचे पाणी काढून टाका. थोडे कंडिशनर घ्या आणि केसांना लावा. 2 ते 3 मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा.

सीरम

सीरम दिसायला हलका, तेलकट किंवा जेलसारखा असते. जे केसांच्या स्टायलिंगसाठी वापरले जाते. सीरम केसांना चमकदार बनवण्यास मदत करते, फ्रिजीनेसपणा कमी करते आणि केसांना गुळगुळीत करते. सीरम केसांसाठी एक प्रकारचा संरक्षक थर तयार करतो. ज्या लोकांचे केस कोरडे आणि निर्जीव आहेत त्यांच्यासाठी सीरम अधिक फायदेशीर आहे. स्ट्रेटनर, कर्लर किंवा हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी ते लावल्याने तुमचे केस उष्णतेमुळे खराब होण्यापासून वाचतात. हे केसांचा पोत सुधारण्यास आणि स्प्लिट एंड्स कमी करण्यास मदत करते. केस धुतल्यानंतर आणि सुकल्यानंतर केसांना थोड्या प्रमाणात सीरम लावा. याशिवाय सीरम तुम्ही केसांच्या टोकांना लावा. यामुळे केस वाढण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?