AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टरबूज अनेकांना आवडतं, फायदे माहित आहेत का? वाचा

टरबूज खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात, याचे कारण टरबूजमध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने पचनक्रियाही व्यवस्थित होते. चला तर मग कलिंगड खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

टरबूज अनेकांना आवडतं, फायदे माहित आहेत का? वाचा
WatermelonImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 29, 2023 | 12:42 PM
Share

उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. त्याचबरोबर या ऋतूत लोकांना टरबूज खायला आवडतं. हे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तुम्हाला माहित आहे का कलिंगड खाल्ल्याने तुमच्या त्वचेलाही फायदा होतो. होय, टरबूज खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात, याचे कारण टरबूजमध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने पचनक्रियाही व्यवस्थित होते. चला तर मग कलिंगड खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

टरबूज खाल्ल्याने त्वचा चमकदार होते

उन्हाळ्यात टरबूज भरपूर खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. कारण टरबूजमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्याचे काम करते. इतकंच नाही तर याच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्याही दूर करता येतात.

त्वचा हायड्रेट राहते

टरबूज खाल्ल्याने तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. त्याचबरोबर टरबूज खाल्ल्याने त्वचेत ताजेपणा जाणवतो, याचे कारण टरबूज त्वचेला आतून मॉइश्चरायझ ठेवते आणि त्वचा निरोगी राहते.

सनबर्नपासून सुटका

टरबूज खाल्ल्याने सनबर्नपासूनही आराम मिळतो. टरबूजमध्ये असे गुणधर्म असतात जे सनबर्न दूर करण्यास मदत करतात. इतकंच नाही तर कलिंगडाचा लगदा मुरुमांमध्ये आराम देतो आणि त्वचेचा काळेपणाही दूर करतो.

टरबूज खाल्ल्याने त्वचेतील बारीक रेषांची समस्याही कमी होते. कारण टरबूजमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जी बारीक रेषा कमी करून सुरकुत्या देखील कमी करतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?