AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा ब्लड ग्रुप कोणता ? ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा धोका अधिक

देशात दरवर्षी लाखो लोकांना स्ट्रोक येतो. त्यामध्ये बरेचसे असे लोक आहेत ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असते. आपला रक्तगट म्हणजेच ब्लडग्रुप आणि स्ट्रोक यांचा परस्परांशी संबंध असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

तुमचा ब्लड ग्रुप कोणता ? 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा धोका अधिक
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 05, 2023 | 1:55 PM
Share

नवी दिल्ली – जेव्हा आपल्या मेंदूच्या कोणत्याही भागात होणारा रक्तपुरवठा थांबतो तेव्हा स्ट्रोकची (Stroke) स्थिती उद्भवते. रक्तप्रवाह न झाल्याने मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात आणि मेंदूचा काही भाग खराब होतो. या परिस्थितीला ब्रेन स्ट्रोक अथवा ब्रेन ॲटॅक असे म्हटले जाते. सुमारे 60 टक्के प्रकरणांमध्ये स्ट्रोकमुळे लोकांचं अर्ध शरीर लुळं होऊ शकतं. योग्य वेळी उपचार न झालयास स्ट्रोकमुळे (संबंधित) व्यक्तीचा मृत्यू (death) होऊ शकतो. स्ट्रोक ही अशी एक गंभीर स्थिती आहे, जी रक्तगटाशीदेखील संबंधित आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की विशिष्ट रक्तगट (blood group) असलेल्या लोकांना 60व्या वर्षापूर्वी स्ट्रोकचा धोका अधिक असतो, तर काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असतो.

स्ट्रोकचा ब्लडग्रुपशी काय संबंध आहे आणि तो कसा टाळता येईल ते जाणून घेऊया.

A ब्लडग्रुप असणाऱ्या लोकांना स्ट्रोकचा धोका अधिक

अमेरिकन ॲकॅडमी ऑफ न्युरॉलॉजीच्या मेडिकल जर्नलमध्ये या संदर्भात अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. या अभ्यासानुसार, A ब्लडग्रुप असलेल्या व्यक्तींना इतर लोकांपेक्षा वयाच्या 60 वर्षापूर्वी पक्षाघाताचा झटका येण्याचा धोका 18 टक्के जास्त असतो. तर O हा रक्तगट असलेल्या लोकांना ही जोखीम कमी असते. O रक्तगट असणाऱ्या लोकांना 60 व्या वर्षापूर्वी स्ट्रोकचा धोका इतर सर्वांपेक्षा 12 टक्के कमी असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर A रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका सर्वाधिक तर O रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका कमी असतो.

याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या रक्तगटांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. मात्र, जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर काही गोष्टी लक्षात घेऊन हा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असेही संशोधकांनी नमूद केले आहे.

संशोधकांनी सांगितले कारण

अमेरिकेतील बाल्टीमोर येथील मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसीन येथील संशोधकांनी हा अभ्यास केला होता. यामध्ये 5.76 लाख निरोगी लोकांचा समावेश होता, तर स्ट्रोकचा झटका आलेल्या 16,927 लोकांचा समावेश होता. 48 अभ्यासांच्या मेटा-ॲनॅलिसिसनंतर, संशोधकांनी स्ट्रोकबद्दल अनेक खुलासे केले. या अभ्यासाचे प्रमुख लेखक ब्रॅक्सटन मिशेल यांनी सांगितवे की A ब्लडग्रुप असलेल्या लोकांमधये रक्त गोठण्याचा म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. पण या अभ्यासातून ब्लडग्रुप आणि स्ट्रोक यांच्यातील थेट संबंध सिद्ध होऊ शकला नाही. वेगवेगळे वंश आणि वांशिक गटांच्या लोकांसाठी या गोष्टी वेगळ्या असू शकतात, त्यासंदर्भात आणखी संशोधन करण्याची गरज आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, 2020 मध्ये जगभरात 35 लाख लोक स्ट्रोकच्या विळख्यात सापडले असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. जीवनशैलीत आवश्यक ते बदल करून स्ट्रोकचा एकंदर धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो. दररोज व्यायाम करणे, सकस आहार घेणे तसेच धूम्रपानाची सवय सोडल्यानेही हा धोका कमी होतो.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.