AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brittle Nails: तुमची नखेही सहज तुटतात का? तर करा ‘या’ 5 गोष्टी नखे दिसतील अधिक सुंदर!

Brittle Nails: लांब आणि सुंदर नखे प्रत्येक मुलीला आवडतात. पण सुंदर लांब नखे कॅरी करणे सोपे काम नाही. काही मुलींनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची नखे लांब होत नाहीत. नखे थोडीशी वाढली की लगेच तुटतात किंवा वाकतात. जाणून घ्या, यासाठी काही खास टीप्स.

Brittle Nails: तुमची नखेही सहज तुटतात का? तर करा ‘या’ 5 गोष्टी नखे दिसतील अधिक सुंदर!
| Updated on: Aug 03, 2022 | 5:57 PM
Share

मुंबईः शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाची काळजी घेणे आपण अनेकदा विसरतो. होय, आम्ही नखांबद्दल बोलत आहोत. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. तज्ञांच्या मते, कमकुवत आणि सहजपणे तुटलेली नखे (Broken nails) थेट आरोग्याशी संबंधित आहेत. शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे (Due to lack of nutrients) नखे कमकुवत होतात आणि लवकर तुटतात. नखे तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनची कमतरता. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Due to wrong habits) नखे कमकुवत होतात. म्हणूनच आपण जशी चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेतो तशीच आपल्या नखांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कधीकधी कपडे झिप करताना किंवा भांडी धुतांना नखे तुटतात. म्हणून, निरोगी नखांची काळजी घेण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्हालाही नखे वारंवार तुटण्याचा त्रास होत असेल तर काही खास टिप्स अवलंबा. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमची नखे मजबूत आणि निरोगी बनवू शकता.

पौष्टिक अन्न

निरोगी नखांसाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. कारण तुटलेल्या नखांमागे शरीराला योग्य पोषण न मिळणे हे एक प्रमुख कारण असू शकते. आपण दररोज जे अन्न खातो ते पोषण, जीवनसत्त्वे आणि लोहाने समृद्ध असले पाहिजे.

काही कामांसाठी नखे वापरू नका

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या नखांनी काही काम करू नका. जसे की, नखांच्या सहाय्याने, डबा उघडू नका किंवा अशी कामे करू नका. जे, नखांना कमजोर करतात त्यामुळे ते लवकर तुटतात.

नखांना दररोज मॉइश्चरायझ करा

जर तुम्हाला वाटत असेल की, पाणी तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते. तर ते त्वचेसाठी तसेच नखांसाठीही योग्य आहे. त्यामुळे हात धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर हातासह नखांना मॉइश्चरायझ करा.

नेल पेंटचा वापर

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नखांवर नेहमी चांगल्या दर्जाची नेल पेंट लावा. काही लोकांना नेलपेंटचा वास आवडत नाही. पण, जर तुम्हाला लांब नखांची आवड असेल आणि त्यांना तुटण्यापासून रोखायचे असेल तर त्यांच्यावर नेल पेंटचा थर नक्कीच लावा.

नेलपॉलिश रिमूव्हरचा अतिवापर करू नका

आठवड्यातून एकदाच नेलपॉलिश वापरणे पुरेसे आहे. हे केवळ नखांसाठीच हानिकारक नाही तर त्यात असलेले अॅसिटोन, अल्कोहोल त्वचेलाही हानी पोहोचवू शकतात.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.