नवी दिल्ली : संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनमधील कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. चीनचा दक्षिण पूर्व प्रांत फुजियान मधील पुतियान या शहरात यामुळे चित्रपटगृह, जिम, हायवे बंद करण्यात आले आहेत. तर, शहरातील नागरिकांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या वाढल्यानं पुतियान शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.