AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes Dangerous for Brain Health: मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरतो मधुमेह, स्मृतीभ्रंशाचाही धोका

मधुमेह हा अतिशय घातक आजार असून तो एकदा झाला की आयुष्यभर राहतो. त्याकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर आपल्या शरीराच्या अवयवांवर वाईट प्रभाव पडू शकतो. मधुमेहाचा आपल्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

Diabetes Dangerous for Brain Health: मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरतो मधुमेह, स्मृतीभ्रंशाचाही धोका
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 13, 2023 | 1:19 PM
Share

नवी दिल्ली – मधुमेह (diabetes) हा अतिशय घातक आजार असून तो एकदा झाला की आयुष्यभर राहतो. मात्र काही नियमांचे पालन केल्यास तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. यापूर्वी काही वर्ष हा वृद्धांचा आजार समजला जात होता पण वेगाने बदलणारी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे या आजाराचा (disease) वेगाने प्रसार झाला आहे. आता कमी वयातील नागरिकही या आजाराला बळी पडताना दिसतात. मधुमेहाचा केवळ आपल्या शरीरावरच नव्हे तर मेंदूवरही (dangerous for brain) प्रभाव पडतो.

मधुमेहावरील संशोधनातून असे दिसून आले आहे की मधुमेहाचा शरीराच्या इतर भागांवर परिणाम होत असला तरी त्यामुळे मेंदूच्या काही आजारांनाही चालना मिळते. मधुमेहामुळे स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकाही वाढतो. जर तुम्ही खूप साध्या-साध्या गोष्टी वारंवार विसरत असाल तर तुम्ही मधुमेहाला बळी पडू शकता. चे मधुमेहामुळे मेंदूचे कसे नुकसान होते ते जाणून घेऊया.

स्मृतिभ्रंश : शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेहाचा स्मरणशक्तीवर मोठा परिणाम होतो. टाईप-2 मधुमेहाने ग्रस्त लोकांमध्ये 5 वर्षांच्या आत स्मरणशक्ती कमी होण्याची लक्षणे दिसू लागतात आणि काही प्रकरणांमध्ये त्यांना बोलण्यातही अडचण येते. ज्यांचे वय जास्त आहे अशा लोकांवर त्याचा प्रभाव जास्त पडतो.

ब्रेन फॉगची समस्या : मधुमेहामुळे ब्रेन फॉगची समस्याही वाढू लागते. ब्रेन फॉग ही अशी मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये आपले मन नीट एकाग्र होऊ शकत नाही. आणि मूड लवकर बदलतो. तसेच गोष्टी लक्षात ठेवण्यातही अडचण येते.

ब्रेन स्ट्रोकचा धोका : मधुमेहाचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. मधुमेहामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. मेंदूला रक्तपु, हे स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरते.

अल्झायमरचा धोका : काही संशोधनांमधून हे समोर आले आहे की मधुमेहामुळे अल्झायमरचा धोकाही वाढतो. मधुमेह जितका अल्झायमर होण्याची शक्यता तितकी जास्त असते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.