AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिशीनंतर हे पदार्थ खायचे टाळा नाहीतर म्हतारपण लवकरच!

आहारतज्ञ सांगतात की, वयाची तिशी ओलांडल्यावर जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आणि भविष्यात आरोग्याशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात.

तिशीनंतर हे पदार्थ खायचे टाळा नाहीतर म्हतारपण लवकरच!
Stop eating this food after 30Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 17, 2023 | 10:55 AM
Share

मुंबई: जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीराच्या गरजा बदलत जातात. वयाची तिशी ओलांडल्यावर खाण्या-पिण्याची खूप काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपल्याला अशा आजारांना सामोरे जावे लागेल की अकाली म्हातारपणा येईल. या वयात आपल्या शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे थकवा, सांधेदुखी, अंगदुखी आणि अनेक समस्या उद्भवू शकतात. या वयात आपलं शरीर कमकुवत नसलं तरी योग्य आहार घ्यायला हवा.

आहारतज्ञ सांगतात की, वयाची तिशी ओलांडल्यावर जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आणि भविष्यात आरोग्याशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात.

बटाट्याच्या चिप्सची चव सर्व वयोगटातील लोकांना आवडते, जगभरातील व्यावसायिक चिप्सच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमावतात, हा पदार्थ कितीही लोकप्रिय असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नाही. जर तुमचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते टाळा. कारण चिप्स चवीने चांगले व्हावेत म्हणून ते सिंथेटिक गोष्टींमध्ये मिसळले जातात. तसेच त्यात सोडियमचे प्रमाण जास्त आहे ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

दही खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो यात शंका नाही, यामुळे शरीर थंड तर होतेच, शिवाय पचनाशी संबंधित समस्याही दूर होतात, पण जर तुम्ही तुमचा 30 वा वाढदिवस साजरा केला असेल तर चवदार दहीपासून दूर राहा कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहताना किंवा संध्याकाळी घरी पॉपकॉर्न खायला आपल्याला आवडतं, हे निरोगी पद्धतीने बनवल्यास ते आरोग्यदायी ठरू शकतं, पण सहसा बाजारात ते बनवण्यासाठी भरपूर मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचा वापर केला जातो, ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं. तिशीनंतर या पदार्थापासून देखील दूरच राहावं.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.