AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गोष्टींनी पटकन वजन वाढतं, खाऊच नये!

खरंतर असे अनेक पदार्थ असतात जे खूप चविष्ट असतात आणि ते आपण टाळू शकत नाही. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि ट्रिपल व्हेसल रोगाचा धोका वाढतो. चला तर मग जाणून घेऊया कोणते खाद्यपदार्थ खाणे बंद करावे.

या गोष्टींनी पटकन वजन वाढतं, खाऊच नये!
Weight loss dietImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 03, 2023 | 5:18 PM
Share

आपल्यापैकी बहुतेकांना वजन कमी करायचे असते, कारण लठ्ठपणामुळे आपल्या शरीराचा आकार पूर्णपणे बिघडतो आणि सौंदर्यावर परिणाम होतो. पोट आणि कंबरेभोवतीच्या चरबीशी लढण्यासाठी आपण जबाबदार आहोत यात शंका नाही. खरंतर असे अनेक पदार्थ असतात जे खूप चविष्ट असतात आणि ते आपण टाळू शकत नाही. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि ट्रिपल व्हेसल रोगाचा धोका वाढतो. चला तर मग जाणून घेऊया कोणते खाद्यपदार्थ खाणे बंद करावे.

  1. घरातील वस्तू तळण्यासाठी रिफाइंड तेलाचा वापर खूप वाढला आहे, परंतु हे तेल खूप धोकादायक ठरू शकते, कारण यामुळे लठ्ठपणाव्यतिरिक्त हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्याऐवजी आपण नारळ तेल वापरू शकता.
  2. बटाटा चिप्स सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्नॅक म्हणून खाल्ले जाते, घरगुती पार्ट्यांमध्ये ते खूप पसंत केले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की यात ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका वाढतो. नंतर याने पोटाची चरबी देखील वाढते.
  3. गेल्या काही दशकांत प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा कल लक्षणीय वाढला आहे, हे पदार्थ अनेक दिवस जपून ठेवता येतात. पण ते तयार करण्यासाठी अशा अनेक प्रक्रियांचा अवलंब केला जातो ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे आपण ताज्या गोष्टी खाणं गरजेचं आहे.
  4. आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या साखरेला रिफाइंड शुगर म्हणतात, त्याच्या मदतीने बनवलेल्या मिठाई, आईस्क्रीम आणि पुडिंग्स सारख्या गोष्टी जास्त खाल्ल्याने शरीरात फॅट शुगर वाढू लागते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच