AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यायाम करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

व्यायाम करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले की अचानक तुमच्या हृदयाचे कार्य थांबते, ज्यामुळे रुग्णाचा ताबडतोब मृत्यू होतो. व्यायामाच्या वेळी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वर्कआऊट करताना तुम्ही कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

व्यायाम करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?
do not ignore this while doing exerciseImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 14, 2023 | 6:22 PM
Share

मुंबई: आजच्या काळात बहुतांश लोक फिट राहण्यासाठी जिममध्ये जातात. गेल्या अनेक दिवसांपासून व्यायामा दरम्यान लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार दिसून येत आहेत. व्यायाम करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले की अचानक तुमच्या हृदयाचे कार्य थांबते, ज्यामुळे रुग्णाचा ताबडतोब मृत्यू होतो. व्यायामाच्या वेळी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वर्कआऊट करताना तुम्ही कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

वर्कआऊट दरम्यान या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

हृदयाचे असामान्य ठोके

व्यायाम करताना छातीत दुखणे आणि अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे होते तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबा आणि हृदयाची धडधड नॉर्मल झाल्यावरच पुन्हा व्यायाम करा.

जास्त थकवा

वर्कआऊट करताना जास्त थकवा जाणवत असेल तर ते हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण आहे. कारण कोलेस्टेरॉल मज्जातंतूंना ब्लॉक करण्याचे काम करते, ज्यामुळे रक्तदाबावरदेखील परिणाम होतो आणि आपल्याला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे जर तुम्हाला जास्त थकवा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

श्वास घेण्यास त्रास होणे

काही लोकांना व्यायाम करताना श्वास घेण्यास त्रास होतो, ही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याची समस्या देखील दर्शवतात. अशावेळी थांबा आणि 10 मिनिटांनंतर हलका व्यायाम करा.

छातीत दुखणे

व्यायाम करताना छातीत दुखत असेल तर त्याच वेळी व्यायाम थांबवावा. त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार अशी समस्या येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही एखादी समस्या असते तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.