AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीस मिनिटांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे हे पाच व्यायाम, ओमिक्रॉनला पळवून लावतील

घरच्या घरी कुठल्याही साधनांशिवाय तुम्हाला असे व्यायामाचे प्रकार सांगणार आहोत, ज्यातून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढून ओमिक्रॉनसह अन्य संधीसाधू आजारांविरोधातही लढण्यासाठी तुमच्या शरीराला मदत करतील, चला तर मग बघूया हे व्यायाम नेमके कुठले आहेत ते...

वीस मिनिटांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे हे पाच व्यायाम, ओमिक्रॉनला पळवून लावतील
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 2:18 PM
Share

रोज लवकर झोपून लवकर उठून नियमित व्यायाम (exercises) करण्याचा सल्ला आपण कोणाच्या तरी तोंडून एकलाच असेल. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वच जण जिममध्ये जातात किंवा रनिंग, चालणे आदी विविध पध्दतीने व्यायाम करीत असतात. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोना महामारीमुळे अगदी त्रस्त झालो आहोत. कोरोना वाढीच्या काळात तर आपल्याला घराबाहेरदेखील पडणे अशक्य झाले होते, अनेक जण जिममध्ये जाण्यासाठी जायबंदी झाले होते. याला पर्याय म्हणून अनेकांनी घरात राहून कुठल्याही साधनांशिवाय योगा, (Yoga) सूर्यनमस्कार, दोरीउड्या आदी व्यायामांचा अवलंब करुन आपली रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढविण्याचा प्रयत्न केला. कोरोना (corona) काळात रोगप्रतिकारशक्तीचे महत्व सर्वांनी जाणले. तज्ज्ञांकडूनही ती वाढविण्यावर भर देण्याचा विशेष सल्ला देण्यात येत होता. व्यायामामुळे शरीर पिळदार होउन रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे आधिच सिध्द झाले आहे. कुठल्याही साहित्यांशिवाय असे काही व्यायाम प्रकार आहेत, जे तुमची रोगप्रतिकारशक्ती अवघ्या काही दिवसांमध्ये वाढविण्यास तुम्हाला नक्कीच मदत करतील.

1) दोरीउड्या

दोरीउड्या हा व्यायामप्रकार आपण लहानपणी अनेकांनी खेळ म्हणून खेळलेला आहे. अगदी सहजपध्दतीने दोरीशिवाय अन्य कुठल्याही साधनांची याला गरज नाही. तुम्ही सकाळी तीन ते चार मिनिट हा व्यायाम करुन शकतात. सुरुवातीला सवय नसल्याने हळूहळू तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळ वाढविता येते. 15 ते 20 मिनिटांच्या या व्यायामामुळे 250-300 कॅलरी सहज कमी होउ शकतात. दोरीउड्या मारताना आपले गुडघे वाकणार नाहीत याची काळजी मात्र घ्यायला हवी.

2) पुशअपस्

खासकरुन तरुणांमध्ये पुशअपस्‌ हा व्यायामप्रकार फार प्रचलित असल्याचे आपल्याला दिसून येते. पुरुषांसोबतच महिलादेखील हा व्यायाम प्रकार करुन शकतात. शरीराचे संतुलन राखण्याचा हा व्यायाम असून यात, हात व पायांवर शरीराचे वजन पेलण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. हात, छाती, पोट आदी भागांवर यामुळे तणाव निर्माण होउन शरीर बळकट होते. पुशअपस्‌ करताना हात हे छातीच्या बाहेर व डोक्याच्या सरळ रेषेत ठेवावे

3) सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकाराला योगाभ्यासात फार आधीपासून महत्व प्राप्त झाले आहे. सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकारातून शरीरातील सर्व अवयवांचा कस लागत असतो. त्यामुळे व्यायाम प्रकारात सूर्यनमस्काराला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. हादेखील शरीर संतुलनाचा प्रकार असून हा व्यायाम करीत असताना तोंडाव्दारे श्‍वास घेणे टाळावे, तसेच एक सूर्यनमस्कारात साधारणत: दोन कॅलरी जळतात.

4) पुलअपस्‌

दोघा हाताच्या सहाय्याने आपल्या शरीराला वर खेचून हळूहळू खाली आणण्याच्या क्रियेल पुलअपस्‌ असे म्हणतात. मजबूत लोखंडी पाइप, छताचा कप्पा, लाकडी पाटी आदींच्या माध्यमातून तुम्ही हा व्यायाम प्रकार सहज करुन शकतात. वजन जास्त असल्याने अनेकांना पहिल्याच प्रयत्नात आपल्या शरीराला पूर्ण वर खेचता येत नसले तरी हळूहळू प्रयत्न करुन हे सहज शक्य असते. यात हातांच्या मांसपेशींना मजबुती मिळण्यास मदत होते.

5) जिना चढणे- उतरणे

घरात बसून अगदी सहज, सोपा व तितकाच प्रभावी व्यायाम म्हणून याकडे पाहिले जाते. जिना वेगाने चढणे व उतरणे हा आपल्या कॅलरीज्‌ बर्न करण्यासाठीचा उत्तम व्यायाम प्रकार आहे. घर किंवा इमारतींमध्ये जिना हा सहज उपलब्ध असतो. फक्त हा व्यायाम करताना ही काळजी घ्यावी, की जिन्यावरील पायरी ही सटकती नको, ग्रीप असलेल्या पायरीवर चढ-उतर करणे सोयीस्कर असते. ते शक्य नसल्यास तुम्ही ग्रीप असलेले बुट यासाठी वापरु शकतात. या व्यायाम प्रकारामुळे पायांच्या मांसपेशींना अधिक बळकटी मिळत असते.

(टीप : सदर लेख उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, यास कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

माजी आमदार सेवक वाघाये यांची घरवापसी; नाना पटोलेंशी आता तरी जुळवून घेणार काय?

Nagpur Medical | मेडिकलमध्ये ऑक्सिजनला लागली होती गळती; मोठी दुर्घटना कशी टळली?

NMC election | नागपुरात भाजपाचा मायक्रो प्लानिंगवर भर; शिवसैनिक म्हणतात, निवडणुकीसाठी पुढाकार कोण घेणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.