Vitamin E Benefits: ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश, व्हिटॅमिन ई ची कमतरता होईल दूर, आरोग्याला मिळतील फायदे

| Updated on: Nov 26, 2021 | 6:08 PM

व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना निर्माण होतात आणि कमजोरी येते. व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Vitamin E Benefits: या गोष्टींचा करा आहारात समावेश, व्हिटॅमिन ई ची कमतरता होईल दूर, आरोग्याला मिळतील फायदे
'या' गोष्टींचा करा आहारात समावेश, विटामीन ई ची कमकरता होईल दूर
Follow us on

Vitamin E Natural Source: हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मात्र धावपळीच्या जीवनातून शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणेही प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. शरिराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वर्कआउट्स, योगा यासोबतच योग्य आहाराचेही विशेष योगदान असते. यासोबतच शरीराच्या फिटनेससाठी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. व्हिटॅमिन ई शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ई शरीराला अनेक आवश्यक घटक देण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते.

आहारात व्हिटॅमिन ईचा समावेश केला तर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून आपण दूर राहू शकतो. व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना निर्माण होतात आणि कमजोरी येते. व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता दूर करण्यासाठी आहारात विटामीन ई समृद्ध पदार्थांचा समावेश करा.

व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले पदार्थ

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्हमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. आहारात ऑलिव्हचा समावेश करून व्हिटॅमिन ईची कमतरता भरुन काढू शकता. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेले अन्न खाऊ शकता. ऑलिव्ह ऑईल अनेक रोगांवर फायदेशीर आहे.

एवोकॅडो (avocado)

एवोकॅडो हे फळ पोषक तत्वांचे भांडार आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. एवोकॅडोचा आहारात समावेश केला तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमची त्वचा आणि शरीर निरोगी बनेल.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्येही ई-विटामीन भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सॅलड किंवा भाजी म्हणून ब्रोकोलीचे सेवन करू शकता. शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तर दररोज ब्रोकोलीचे सेवन करा.

पपई

वजन कमी करण्यासाठी पपई सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पपईमध्ये व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन ईचे गुणधर्म असतात, जे वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात.

शेंगदाणा

शेंगदाणे व्हिटामीन ई चा उत्तम स्त्रोत आहे. शेंगदाण्याचा आहारात समावेश केल्यास तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. भुईमूग साधारणपणे हिवाळ्यात अधिक खाल्ले जाते. (Do these things in your diet and you will eliminate vitamin E deficiency)

इतर बातम्या

Winter Care | हिवाळ्यात त्वचेनुसार योग्य क्रीम कशी निवडाल, कुठल्या त्वचेसाठी कुठली क्रीम वापरावी जाणून घ्या

PROTEIN : प्रोटीनसाठी मांसाहार, सप्लिमेंटची गरज नाही, मक्याच्या नव्या वाणात 250 टक्के जास्त प्रोटीन