Winter Care | हिवाळ्यात त्वचेनुसार योग्य क्रीम कशी निवडाल, कुठल्या त्वचेसाठी कुठली क्रीम वापरावी जाणून घ्या

हिवाळा (Winter) म्हटलं आठवतं उबदार ब्लँकेट, सकाळी कोवळ्या उन्हात बसणे आणि रात्रीची शेकोटी. हिवाळ्याच्या दिवसात आपण पाण्यात हात टाकणं टाळतो. मग, वारंवार हात-पाय धुणे तर लांबच राहिलं. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा निस्तेज होते. अनेक समस्या उद्भवू लागतात. थंडीच्या मोसमात लोक आळसामुळे त्वचेची काळजी घेणे बंद करतात. मात्र, हे चूकुनही करु नये.

Winter Care | हिवाळ्यात त्वचेनुसार योग्य क्रीम कशी निवडाल, कुठल्या त्वचेसाठी कुठली क्रीम वापरावी जाणून घ्या
winter-creme

मुंबई : हिवाळा (Winter) म्हटलं आठवतं उबदार ब्लँकेट, सकाळी कोवळ्या उन्हात बसणे आणि रात्रीची शेकोटी. हिवाळ्याच्या दिवसात आपण पाण्यात हात टाकणं टाळतो. मग, वारंवार हात-पाय धुणे तर लांबच राहिलं. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा निस्तेज होते. अनेक समस्या उद्भवू लागतात. थंडीच्या मोसमात लोक आळसामुळे त्वचेची काळजी घेणे बंद करतात. मात्र, हे चूकुनही करु नये. उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही त्वचेची विशेष काळजी घ्यावी –

तुमच्या त्वचेनुसार योग्य क्रीम कशी निवडायची ते जाणून घ्या –

1. कोरडी त्वचा (dry skin)

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेत तेलाची कमतरता असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे त्वचेवर क्रीम लावल्यानंतरही ती लवकर कोरडी होते. अशा त्वचेवर क्रीम जास्त काळ काम करत नाही. अशा परिस्थितीत, कोरडी त्वचा अगदी थंड हवामानात देखील खूप लवकर कोरडी पडते, अशा प्रकारच्या त्वचेसाठी तुम्हाला अशी क्रीम निवडावी लागेल ज्यामध्ये हायड्रेटिंग गुणांचा समावेश असेल.

2. तेलकट त्वचा (oily skin)

हिवाळ्यातही अनेकांची त्वचा तेलकट असते. या प्रकारच्या त्वचेमुळे चेहरा तेलकट राहतो. त्यामुळे अशी त्वचा असलेल्या लोकांचा चेहरा क्रीम लावल्यानंतर चिकट होतो. तेलकट त्वचेवर धूळ आणि माती, पिंपल्सची समस्या अधिक असते. अशा परिस्थितीत, तेलकट त्वचा असलेल्यांनी जेल, सीरम आणि अशा क्रीमची निवड करावी ज्यामध्ये हायड्रेटिंग गुणधर्म कमी आहेत.

3. संवेदनशील त्वचा (sensitive skin)

संवेदनशील त्वचेच्या लोकांना हिवाळ्यात खाज येण्याची समस्या उद्भवू शकते, अशी त्वचा असलेल्यांनी स्वतःसाठी क्रीम निवडताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण या त्वचेवर बहुतेक क्रीम्सने ऍलर्जी होऊ शकते. शक्यतोवर, या लोकांनी अँटिऑक्सिडंट आणि सुगंध नसलेल्या क्रीम्सची निवड करावी.

संबंधित बातम्या :

Homemade Body Pack : मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती बॉडी पॅक फायदेशीर, वाचा! 

Homemade Face Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ 5 होममेड फेस मास्क फायदेशीर! 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI