AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिसमध्ये झोप येते? ‘या’ 2 गोष्टी करून बघा

अनेकदा यामुळे काम कमी होते, डोकं चालत नाही, या परिस्थितीला अजिबात हलक्यात घेऊ नका, अन्यथा अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवणासाठी अशा गोष्टी करणं चांगलं.

ऑफिसमध्ये झोप येते? 'या' 2 गोष्टी करून बघा
दुपारची झोप हाय बीपी असलेल्या लोकांसाठी फायद्याची असते. यासोबतच दुपारीची झोप शरीरातील हार्मोनच्या बॅलेंससाठी फायद्याची असते. दुपारची झोप तुम्हाला तणावापासून वाचवू शकते. जे लोक बराच वेळ बसून काम करतात. त्यांच्यासाठी दुपारची झोप फायदेशीर ठरू शकते.
| Updated on: May 28, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई: आपल्यापैकी काही जण असे असतात ज्यांना ऑफिसमध्ये काम करताना लवकर थकवा यायला लागतो, मग आळशीपणा आणि अंगदुखीला सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत सामान्यपणे काम करणे कठीण होऊन बसते. अनेकदा यामुळे काम कमी होते, डोकं चालत नाही, या परिस्थितीला अजिबात हलक्यात घेऊ नका, अन्यथा अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवणासाठी अशा गोष्टी करणं चांगलं. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकता ते जाणून घेऊया.

थकवा दूर करण्यासाठी सकाळी करा ‘या’ 2 गोष्टी

दिवसभर थकवा किंवा सुस्तीतून जायचे नसेल तर सकाळपासूनच उपाय करावे लागतील. झोपेतून उठून नवी जीवनशैली स्वीकारावी लागेल. जाणून घेऊया सविस्तर.

  • सकाळी उठल्यानंतर आधी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश व्हा आणि मग लगेच मॉर्निंग वॉकला निघा, 30 मिनिटं ते एक तास चाललो तर शरीराला थोडी ऊर्जा मिळेल.
  • सकाळी 15 मिनिटे चालल्यास तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील कारण इस्ट्रोजेन आणि डोपामाइन सारख्या हॅपिनेस हॉर्मोन्सची पातळी वाढेल आणि तुम्हाला टेन्शन देणाऱ्या कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी होईल. हे आपल्याला तणावापासून वाचवेल, जे दिवसभराच्या थकव्याचे एक प्रमुख कारण असू शकते.
  • सकाळी उठून चालल्याने तुमच्या स्नायूंना आणि हाडांना कमालीची ताकद मिळते, ज्यामुळे थकवा आणि अंगदुखीची समस्या कमी होते.
  • मॉर्निंग वॉकचा चांगल्या झोपेशी थेट संबंध आहे. जर तुम्ही रात्री शांत झोप घेत असाल तर दिवसा थकवा नगण्य राहील.
  • हल्ली लहान-मोठ्या सर्वच शहरांतील बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर खूप जास्त आहे, सोयीस्कर आहे, पण लिफ्टचा वापर माणसाला खूप आळशी बनवतो. पण तुम्ही सकाळी उठून किमान 10 ते 15 मिनिटं पायऱ्या चढा असे केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढेल. पाणी प्यायल्याशिवाय हे काम करू नका.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.