अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल

संशोधनात असे सिध्द झालेय, की जेव्हा आपण जमिनीवर किंवा कोणत्याही गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल
प्रातिनिधिक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Feb 08, 2022 | 12:54 PM

मुंबई : आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे (benefits) मिळत असतात. तसेच कर्करोगासारख्या अनेक असाध्य रोगांपासूनही आपला बचाव होत असतो. त्यामुळे सकाळ- सायंकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालले पाहिजे. त्याच बरोबर अनेकांकडून आपल्याला अनवाणी चालण्याचाही सल्ला दिला जात असतो. अनवाणी चालण्यामुळे (walking) डोळ्यांपासून ते अगदी ह्रदयापर्यंत त्याचे फायदे आहेत. जुने जाणते लोक आपणास अनेकदा अनवाणी चालताना (walking barefoot) दिसतात. त्याबद्दल त्यांच्याकडून अनेक फायदे सांगण्यात येत असतात. धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण पूर्णपणे व्यस्त झालो आहोत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपल्याला सर्वात जास्त निसर्ग उपचाराची गरज आहे. निसर्गोपचार हे निसर्गाच्या अनेक गुणधर्मांनी उपचार करते. आजकाल आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, आपण पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सच्या संपर्कात आल्यावर त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, त्याचाच एक भाग म्हणजे अनवाणी चालणे, त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

दृष्टी सुधारते

गवतावर अनवाणी चालणे खूप फायदेशीर असते, असे अनेक जण सांगतात. असे केल्याने दृष्टी अधिक तेजस्वी होते. अनवाणी चालण्याने आपल्या पायाच्या तळव्यावरील दाब बिंदू पूर्णपणे सक्रिय होतात. रिफ्लेक्सोलॉजी सायन्सच्या अहवालानुसार, जेव्हा आपण असे चालतो तेव्हा आपल्या पायांचा सर्वात जास्त दबाव बोटांवर पडतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूचा शेवट असतो, जो दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तदाबाची समस्याही दूर होते.

मनाला शांती मिळते

उद्यानात किंवा कुठेही गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक वयस्क मंडळी सायंकाळी गवतावर अनवाणी चालताना दिसतात.

हृदयाची ठोके सुधारतात

एका अभ्यासानुसार, जेव्हा आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ह्रदयाचे ठोके हे हार्मोन्सपासून ते शरीराच्या तापमानापर्यंत अनेक गोष्टींचे नियमन करत असते त्यामुळे त्याचे संतुलन अत्यंत महत्वाचे मानले जाते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालत असाल, तर सूर्यापासून व्हिटॅमिन डी देखील मिळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करते, या शिवाय अनवाणी चालण्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहत असते.

इतर बातम्या

कोरोनातून बरे झालात तरीही डोकेदुखीचं चक्र सुरुच आहे? हे काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात!

पुन्हा लॉकडाऊन! चीनमधील कोणत्या शहरात लॉकडाऊनचा निर्णय? रुग्णवाढीचा आकडा पाहून चकीतच व्हाल

Diabetes tips: अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार, शुगर येईल लवकरच नियंत्रणात!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें