AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कॅल्शियम शरीरासाठी अत्यंत महत्वाचे…

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हातपाय दुखण्यास देखील सुरूवात होते. अशा परिस्थितीत तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. कमी कॅल्शियममुळे माणसाला सतत थकवा जाणवतो. वारंवार चक्कर येण्याची समस्या निर्माण होते.

Health | शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कॅल्शियम शरीरासाठी अत्यंत महत्वाचे...
| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 11:35 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहितीयं की, चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम (Calcium) हे अत्यंत महत्वाचे आहे. इतर पोषक तत्वांप्रमाणेच कॅल्शियम हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना (Problem) सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही आहारात कॅल्शियम युक्त अनेक प्रकारच्या पदार्थांचाही समावेश करू शकता. ते कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्याचे काम करतात. शरीरात (Body) कॅल्शियमची कमतरता असेल तर नेमकी कोणती लक्षणे दिसतात हे आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत.

केस कोरडे होतात आणि वाढ कमी होण्यास सुरूवात होते

जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर आपले केस कोरडे होतात. इतकेच नाही तर केस हळूहळू वाढतात. हे प्रामुख्याने शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला तणाव जाणवू लागतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखे ठिसूळ होऊ लागतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांसंबंधी समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये दात किडण्याचा धोका सर्वात अधिक असतो.

वारंवार चक्कर येण्याची मोठी समस्या

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हातपाय दुखण्यास देखील सुरूवात होते. अशा परिस्थितीत तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. कमी कॅल्शियममुळे माणसाला सतत थकवा जाणवतो. वारंवार चक्कर येण्याची समस्या निर्माण होते. ज्या लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते त्यांना दुखापत आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी काही महत्वाच्या पदार्थांचा आपण आहारामध्ये नक्कीच समावेश करावा.

हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा

तुम्ही तुमच्या आहारात सोया उत्पादनांचा समावेश करू शकता. यात सोया दूध आणि सोयाबीन इत्यादींचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. हे पदार्थ हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तसेच आपण हिरव्या पालेभाज्यांचा आहारात मसावेश करावा. यामुळे देखील शरीरामधील व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते. जर आपल्या शरीरात नेहमीच कॅल्शियमची कमतरता झाली तर आपले हाडे कमकुवत होण्यास सुरूवात होते.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी