जास्त तहान लागणे ‘या’ आजारांचे असू शकते लक्षण!
जर तुम्हालाही हा आजार असेल तर ते हलक्यात घेऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळीच काय झाले आहे हे कळेल. जास्त तहान लागणं हे देखील दुसऱ्या आजाराचं लक्षण असू शकतं, जाणून घेऊया.

मुंबई: पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते कारण आपल्या शरीराचा बराचसा भाग या द्रवापासून बनलेला असतो, विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाण्याचे सेवन जास्त असावे, परंतु काही लोक असे असतात जे दर तासाला जास्त पाणी पितात, हा एक आजार असतो. या वैद्यकीय अवस्थेला पॉलीडिप्सिया देखील म्हणतात. जर तुम्हालाही हा आजार असेल तर ते हलक्यात घेऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळीच काय झाले आहे हे कळेल. जास्त तहान लागणं हे देखील दुसऱ्या आजाराचं लक्षण असू शकतं, जाणून घेऊया.
जास्त तहान लागणे ‘या’ आजारांचे लक्षण असू शकते
डिहायड्रेशन
हा आजार नसून एक वाईट वैद्यकीय स्थिती आहे. डिहायड्रेशन ही अशी स्थिती आहे जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची खूप कमतरता असते. अशावेळी चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, अतिसार आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मधुमेह
जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा मधुमेह होतो, तेव्हा तो सहजासहजी लक्षात येत नाही, लक्षात ठेवा की जास्त तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. असे होते कारण आपले शरीर द्रवपदार्थांचे योग्य प्रकारे नियमन करण्यास सक्षम नसते. जेव्हा तुम्हाला खूप तहान लागते तेव्हा रक्तातील साखरेची तपासणी नक्की करून घ्या.
कोरडे तोंड
तोंड कोरडे असेल तर थोड्याच वेळात पाणी पिण्याची इच्छा होते. ग्रंथी योग्य प्रकारे लाळ तयार करू शकत नाहीत तेव्हा तोंड कोरडे होते. यामुळे एखाद्या व्यक्तीला हिरड्यांचा संसर्ग आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागू शकते.
ॲनिमिया
जेव्हा आपल्या शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असते तेव्हा ॲनिमिया हा आजार होतो. याला सामान्य भाषेत रक्ताची कमतरता असेही म्हणतात. अशा वेळी खूप तहान लागते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
