AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात आजारांपासून दूर रहायचे असेल तर ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समाावेश

हिवाळ्याच्या दिवसात आपली तब्येत खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. पण आहार योग्य असेल तर चिंता करण्याची गरज नाही.

हिवाळ्यात आजारांपासून दूर रहायचे असेल तर 'या' सुपरफूड्सचा आहारात करा समाावेश
Image Credit source: Freepik
| Updated on: Nov 14, 2022 | 9:36 AM
Share

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. हवामानात होणाऱ्या बदलांसोबतच आपल्या आहारातही बदल होत असतात. हिवाळ्यात (winter days) अशा काही पदार्थाचा आहारात (diet) समावेश केला जातो, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊब मिळते. मात्र हिवाळ्यात आपले आरोग्य बिघडण्याचाही धोका असतो. एखादी छोटीशी चूकही झाली तर सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार होऊ शकतात. पण जर आपला आहार चांगला व योग्य असेल तर या आजारांना घाबरण्याची काही गरज नाही. हिवाळ्याच्या दिवसांत पोषक तत्व (nutrition in food) असलेला आहार घेण्याची शिफारस केली जाते.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

हिरव्या पालेभाज्या 

हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या विशेषत: पालेभाज्यांचे उत्पादन भरपूर होते. अशा वेळी आहारात पालक, मेथी, मोहरी, पुदिना आणि विशेषतः हिरव्या लसूण यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराची उष्णता लगेच वाढते, जी थंडीच्या दिवसांसाठी अतिशय योग्य आहे. हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या या लोकप्रिय भाज्या आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

देशी तूप

घरी कढवलेले किंवा बाहेरून आणलेले शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. अन्न तुपात शिजवावे किंवा भात, वरण, पोळीवर तूप लावून त्याचे सेवन करावे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या फॅट्सचा एक अमूल्य स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी सुधारण्यासाठी तूप हा एक सोपा मार्ग आहे.

गाजर खावे हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गाजर हेही त्यापैकीच एक आहे. एका संशोधनानुसार, ज्या लोकांनी तीन आठवड्यांसाठी दररोज सुमारे एक कप गाजर खाल्ले, त्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी आढळून आली.

आहारात काजूचा समावेश करा काजूमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक (जस्त) अशी अनेक खनिजे असतात. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे, बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?