अरे बाप! एक पिझ्झा खाल्ल्याने 7.8 मिनिटे तर एका सॉफ्ट ड्रिंकने 12.4 मिनिटे आयुष्य होते कमी. काय खायचे आणि काय नाही? तुम्हीच ठरवा

काही पौष्टिक पदार्थांचा अन्नात समावेश असेल तर तुमचे वय वाढू शकते. पण त्याचबरोबर जर तुमच्या अन्नात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश नसेल तर तुमचे आयुष्य तुम्हीत झपाट्याने कमी करुन घ्याल. तुम्हाला नक्कीच तुमचे आयुष्य वाढावे असेच वाटत असणार, तर हे नक्की वाचाच.

अरे बाप! एक पिझ्झा खाल्ल्याने 7.8 मिनिटे तर एका सॉफ्ट ड्रिंकने 12.4  मिनिटे आयुष्य होते कमी. काय खायचे आणि काय नाही? तुम्हीच ठरवा
पिझ्झा, बर्गर खाताय हे वाचाच. Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 4:10 PM

नवी दिल्ली – प्रत्येकाला वाटत असते की आपण दीर्घायुषी व्हावे, त्यासाठी प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने सजग असतो आणि प्रयत्नही करीत असतो. सध्याच्या वयोमानाची आकडेवारी पाहिली तर, भारतात पुरुषांचे (Male) सरासरी वय हे 69.5 वर्ष आहे, तर महिलांचे (Female)वय 72.2वर्ष इतके आहे. ह्रद्याशी संबंधित आजार, फुफुस्सांचे आजार, स्ट्रोक, मधुमेह यासारख्या किमान 50 असे आजार (decease)आहेत, ज्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते. तुम्ही मृत्यूला लवकर निमंत्रण देऊ शकता. काही पौष्टिक पदार्थांचा अन्नात समावेश असेल तर तुमचे वय वाढू शकते. पण त्याचबरोबर जर तुमच्या अन्नात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश नसेल तर तुमचे आयुष्य तुम्हीत झपाट्याने कमी करुन घ्याल. तुम्हाला नक्कीच तुमचे आयुष्य वाढावे असेच वाटत असणार, तर हे नक्की वाचाच.

हे पदार्थ खाल्ले तर कमी होते आयुष्य

मिशिगन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी खाण्याच्या काही वस्तूंबाबत संशधन केले. या खाद्य पदार्थांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर काय परिणाम होतो, याचा त्यांनी अभ्यास केला. त्यासाठी संशोधनही केले. त्यात त्यांच्या लक्षात आले की असे काही अन्नपदार्थ आहेत, ज्यांचे एकदाही सेवन केले तरी त्याचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या काळावर होऊ शकतो. उदाहरणआर्थ जर तुम्ही एक हॉटडॉग खाल्ले तर तुमचे आयुष्य 36 मिनिटांनी कमी होऊ शकते. यासोबत आणखीही काही असे तुमच्या खाण्यातील दैनंदिन खास्दय पदार्थ आहेत, ज्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते.

  1. चीज बर्गर खात असाल तर तुमचे आयुष्य़ 8.8 मिनिटे कमी होईल.
  2. सॉफ्ट ड्रिंकमुळे जगण्यातील 12.4 मिनिटे कमी होतील.
  3. हे सुद्धा वाचा
  4. एका पिझ्झ्यामुळे जगण्यातील 7.8 मिनिटे कमी होतील
  5. प्रोसेस्ड मीट (बेकन) खाल्ल्याने जगण्यातील 26 मिनिटे कमी होतील
  6. हॉट ड़ॉग खाल्ल्याने जगण्यातील 36 मिनिटे कमी होतील.

हे पदार्थ खाल्ले तर मात्र जगणे वाढेल

असेही काही पदार्थ आहेत, ज्यांचा समावेश जर तुम्ही तुमच्या आहारात केलात, तर तुमचे आयुष्य वाढू शकेल. त्यामुळे या रिसर्चमुधून आपल्याला आपल्या दैनंदिन आहारातील अनेक पदार्थ तातडीने बदलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. आता पाहुयत काय खाल्ले तर आयुष्य वाढेल.

  1. पनीर बटर आणि जॅम सँडविच खाल्ले तर आयुष्य 33.1 मिनिटांनी वाढू शकेल.
  2. बेक केलेला सेल्मन मासा खाल्ला तर आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढू शकेल
  3. एक केळं जर रोज आहारात घेतलंत तर आयुष्य 13.5  मिनिटांनी वाढू शकेल.
  4. एक टोमॅटो रोज खाल्लात तर 3.8 मिनिटांची वाढ होईल.

सहा हजार खाण्यांच्या पदार्थांवर केले संशोधन

नेचर फूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, हा अभ्यास जगण्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक आहे. या अभ्यासात संशोधकांनी सुमारे सहा हजार वेगवेगळे पदार्थ त्यात नाश्ता, जेवण आणि पेय यांचा अभ्यास केला. या संशोधनातून अनेकांना त्यांच्या प्रकृतीविषयी जागरुकता येईल आणि त्यानुसार ते त्यांच्या आहारात बदल करतील, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जगण्यात फास्ट फूडच्या जमान्यात सगळ्यांनीच त्यांच्या आहारात बदल करण्याची गरजही, संशोधकांनी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.