Eye Care Tips : डोळ्यांवर ताण येतोय? करा ‘हा’ व्यायाम आणि मिळवा आराम!
मोबाईलचा अतिरिक्त वापर, ऑफिसमध्ये कम्प्युटर समोर सतत असणं अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. आता चिंता करण्याची गरज नाही कारण आता पण काही असे व्यायाम जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण डोळ्यांच्या समस्यांवर मात करा.

Health News : सध्याच्या काळात लोकांचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये मग मोबाईलचा अतिरिक्त वापर, ऑफिसमध्ये कम्प्युटर समोर सतत असणं अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. आजकालची लहान मुले तर मोबाईल शिवाय राहत नसल्याचं चित्र बहुतेक ठिकाणी दिसतं. त्यामुळे या लहान मुलांना कमी वयातच चष्मा लागतो. तर लोक डोळ्यांच्या होणाऱ्या समस्यांमुळे चिंतेत राहतात. पण आता चिंता करण्याची गरज नाही कारण आता पण काही असे व्यायाम जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण डोळ्यांच्या समस्यांवर मात करू.
पामिंग
पामिंग हा असा एक व्यायाम आहे जो आपल्या डोळ्यांना आराम देतो आणि डोळ्यांच्या तणावातून मुक्त करतो. हा व्यायाम करण्यासाठी खाली आरामशीर बसा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात एकत्र घासा आणि नंतर तुमचे हात डोळ्यावर ठेवा आणि डोळे काही मिनिटे बंद करा. तसंच मोठा श्वास घ्या, यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
पापण्यांची उझडझाप करणे
जेव्हा तुम्ही स्क्रीन समोर असता त्यावेळी तुम्ही स्क्रीनकडे एकटक पाहत असता. त्यावेळी पापण्यांची उघडझाप जास्त केली जात नाही त्यामुळे तुमचे डोळे कोरडे आणि चिकट राहतात. तसेच डोळ्यांवर तणाव देखील येतो. त्यामुळे स्क्रीन समोर असताना काही सेकंदाचा फरक ठेवत डोळ्यांची उघडझाप करत जा ज्यामुळे डोळे ओलसर राहतात आणि तणाव कमी होतो.
डोळ्यांची हालचाल
डोळ्यांची हालचाल केल्याने डोळ्यातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे हा व्यायाम करताना तुमचे डोळे घट्ट बंद करा आणि नंतर मोठे डोळे करत ते उघडा, जसं की तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही कृती काही मिनिटे करा. त्यानंतर तुमचं डोकं न हलवता डोळे वर-खाली, उजवीकडे-डावीकडे असे फिरवा.
लक्ष केंद्रित करणे
हा असा व्यायाम आहे जो डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता सुधारण्यास मदत करतो. तसंच डोळ्यांचा तणावही कमी होतो. हा व्यायाम करताना हाताच्या लांबीवर पेन किंवा पेन्सिल धरा आणि त्याकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर काही वेळाने तुमचं लक्ष एखाद्या लांब असलेल्या गोष्टीकडे केंद्रीत करा आणि परत काही वेळाने पेन्सिल/पेनकडे लक्ष द्या. हा व्यायाम तुमच्या डोळ्यांचा ताण कमी करण्यास मदत करतो.
