AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brain Surgery in Womb : आईच्या गर्भातील बाळाची केली यशस्वी ब्रेन सर्जरी, जाणून घ्या कसं झालं अनोखं ऑपरेशन?

अशा प्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, मुलाच्या मेंदूच्या शिरामध्ये गॅलेन मॅलफॉर्मेशन झाल्याचे समोर आले होते. हा आजार 60 हजार मुलांपैकी कोणत्याही एका बालकाला होतो.

Brain Surgery in Womb : आईच्या गर्भातील बाळाची केली यशस्वी ब्रेन सर्जरी, जाणून घ्या कसं झालं अनोखं ऑपरेशन?
| Updated on: May 05, 2023 | 2:15 PM
Share

बॉस्टन : सुभद्रेच्या पोटात असताना अभिमन्यू चक्रव्यूह कसा भेदायचा हे शिकला होता.. तिथूनच त्याला लढण्याचे बाळकडू मिळाले होते. अगदी तसेच नव्हे पण आयुष्याशी लढा देण्याचे बाळकडू पोटात असतानाच एका बाळाला मिळाल्याची घटना समोर आली आहे. आईच्या पोटातच बाळाची ब्रेन सर्जरी (Brain Surgery On Baby Still In Womb)झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेतील बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. हे बाळ किंवा हा गर्भ अवघ्या 34 आठवड्यांचा होता आणि त्यावेळीच त्याला मेंदूच्या आजाराचे निदान झाले होते, ज्यामुळे 30% प्रकरणांमध्ये 11 वर्षापूर्वी मृत्यू होण्याची शक्यता असते. हा आजार 60 हजार मुलांपैकी कोणत्याही एका बालकाला होतो. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. ती पूर्ण होण्यास 20 मिनिटे लागली. ऑपरेशन करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, मुलाच्या मेंदूच्या शिरामध्ये गॅलेन मॅलफॉर्मेशन (Venus of Galen malformation) झाल्याचे समोर आले होते.

हा असा आजार आहे जेव्हा मेंदूतील धमन्या चुकीच्या दिशेने रक्त पाठवू लागतात. परिणामी, रक्त हृदयात भरते. रक्तदाब वाढल्याने मृत्यूचा धोका वाढतो. आता ही शस्त्रक्रिया कशी झाली ते समजून घेऊ.

गर्भात कशी झाली शस्त्रक्रिया ?

  1. 10 तज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करणाऱ्या बोस्टनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी सर्वप्रथम एमआरआयच्या माध्यमातून शस्त्रक्रियेच्या क्षेत्राची नेमकी जागा ओळखली. ते म्हणतात की बाळाला जन्मानंतर आजार होण्याची 99 टक्के शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  2. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी सुईचा वापर केला. अल्ट्रासाऊंडच्या मदतीने योग्य स्थान पाहिल्यानंतर, गर्भवती महिलेच्या पोटाच्या खालच्या भागात गर्भाशयाच्या भिंतीमध्ये एक चीरा देण्यात आली. यानंतर, मुलाच्या मेंदूमध्ये एक चीरा तयार करण्यात आला आणि मेंदूच्या त्या भागामध्ये एक कॉइल बसवण्यात आली जिथे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण झाला होता.
  3. शस्त्रक्रिया करणारे डॉ.डॅरेन सांगतात, आम्ही शस्त्रक्रिया करून बाधित भागाची दुरुस्ती केली. यामुळे मेंदूचे नुकसान, मानसिक आजार किंवा मुलाचा मृत्यू होण्याचा धोका कमी झाला आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि दोन दिवसांनंतर महिलेला वेदना सहन कराव्या लागल्या कारण बाळाची वाढ होत असलेल्या अम्नीओटिक द्रवपदार्थावर परिणाम झाला आणि शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्यात आले.
  4. टीम म्हणते की जेव्हा या मुलाचा जन्म झाला तेव्हा गुंतागुंत नगण्य होती. जन्मावेळी त्याचे वजन 1.9 किलो होते. जन्मानंतर 3 आठवड्यांपर्यंत त्यांना हृदयाशी संबंधित कोणत्याही तपासणीची गरज नव्हती. एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या मेंदूचा रक्तप्रवाह सामान्य असल्याचे समोर आले.डॉक्टरांचे म्हणणे आहे की, 6 आठवड्यांनंतर मेंदूमध्ये कोणतीही नकारात्मक लक्षणे दिसली नाहीत.
  5. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुलाला ज्या आजाराने ग्रासले होते त्याचा थेट परिणाम हृदय आणि मेंदूवर होतो. 2019 मध्ये फ्रान्समध्ये केलेल्या संशोधनानुसार, या आजाराच्या 36 टक्के प्रकरणांमध्ये 11 वर्षांच्या वयात बालकाचा मृत्यू होतो. अशा प्रकरणांवर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम पर्याय आहे.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.