शरीरात कोलेस्टेरॉल वाढले आहे का? ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

आजची व्यस्त जीवनशैली, फास्ट फूडचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणाव यासारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशातच तुम्हाला जर ही पाच लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, लगेच उपाचार करा. चला तर मग आजच्या या लेखात आपण या 5 लक्षणांबद्दल जाणून घेऊयात...

शरीरात कोलेस्टेरॉल वाढले आहे का? या 5 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
cholesterol
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 05, 2025 | 11:10 AM

कोलेस्टेरॉल हे ‘सायलेंट किलर’ सारखे काम करते, जर त्याची लक्षणे वेळीच ओळखली गेली नाहीत तर याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होत असतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. आजच्या बदलत्या जीवनशैली, फास्ट फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलसारख्या समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयरोगांचा धोका अनेक पटीने वाढतो, परंतु बहुतेक लोकं याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त झाल्यास शरीर तुम्हाला आधीच काही लक्षणे जाणवू लागतात. परंतु काही लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. जर ही लक्षणे वेळीच ओळखली गेली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते. कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात कोणती लक्षणे जाणवतात ते आजच्या या लेखात तज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ञ काय सांगतात?

दिल्लीतील पटपडगंज येथील मॅक्स हॉस्पिटलच्या डॉ. मीनाक्षी जैन सांगतात की जर शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असेल तर कोलेस्टेरॉलची रक्त तपासणी किंवा ‘लिपिड प्रोफाइल’ करणे चांगले. या टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या चांगल्या कोलेस्टेरॉलचे आणि खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कळते. परंतु तुम्ही टेस्टशिवाय देखील समजू शकता की शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले आहे. कारण जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरातून आपल्याला काही लक्षणे जाणवतात.

डोळ्यांभोवती पिवळे डाग दिसणे

तुम्हाला जर तुमच्या डोळ्यांभोवती पिवळे ठिपके म्हणजेच ज्याला झेंथेलास्मा म्हणतात ते दिसू लागले तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे स्पष्ट लक्षण असू शकते. हे त्वचेवर दिसणारे फॅटचे छोटे साठे आहेत. हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे.

कॉर्नियाभोवती राखाडी किंवा पांढरी वर्तुळ

जर तुमच्या डोळ्यांच्या कॉर्निया (काळ्या बाहुली) भोवती पांढरा किंवा हलका राखाडी रंगाचा रिंग तयार झाला तर त्याला ‘आर्कस सेनिलिस’ म्हणतात. जर ही लक्षणे तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर समजून घ्या की शरीरात कोलेस्टेरॉल वाढले आहे. जर तुम्हाला याबद्दल कळले तर त्याची टेस्ट करून घ्या.

चालताना छातीत दुखणे

जर तुम्हाला हलके चालल्यानंतर किंवा पायऱ्या चढूनही छातीत जडपणा किंवा वेदना जाणवत असतील, तर हे हृदयापर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नसल्याचे लक्षण असू शकते, जे ब्लॉकेज आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे असू शकते.

श्वास घेण्यास त्रास

तुम्ही काही छोटी कामे केली आणि लगेच थकवा जाणवत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हे शरीरातील ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होण्याचे लक्षण असू शकते, जे कोलेस्टेरॉलशी संबंधित धमनी ब्लॉकेजमुळे असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही ताबडतोब स्वतःची तपासणी करून घ्यावी.

बोटांचा आणि पायांचा रंग निळा होणे

कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे शरीराच्या अवयवांना रक्तपुरवठा योग्यरित्या पोहोचत नसल्याचे लक्षणं दर्शवतात, जर तुमच्या बोटांना आणि पायांना वारंवार निळे किंवा थंड वाटत असेल, तर ते कोलेस्टेरॉल वाढल्याचे एक कारण असू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)