
घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण नेहमी चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो. मात्र, हाताला कधीही सनस्क्रीन लावत नाहीत. हे करणे चुकीचे आहे. आपण हाताला देखील सनस्क्रीन लावली पाहिजे.

जास्त हात धुणे किंवा स्क्रब केल्यानेही हातांचा मऊपणा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत मर्यादेपेक्षा जास्त हात धुणे चुकीचे आहे.

असे दिसून आले आहे की, लोक काम झाल्यावर क्रीम किंवा मॉइश्चरायझर हाताला लावत नाहीत. यामुळे हात खराब होऊन कोरडे होतात. रात्री झोपण्यापूर्वी हातांना मॉइश्चरायझर लावले पाहीजे.

साबणामध्ये केमिकल असते आणि त्यामुळे हातांचे खूप नुकसान होते. यामुळे शक्यतो हातांना साबण लावणे टाळाच.

कोरडे आणि खराब झालेले हात असतील तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्या.