AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाबांची पाने आहेत एक उत्तम आयुर्वेदिक औषध; जाणून घ्या फायदे

जांब किंवा पेरू हे  थंडीत येणारे फळ आहे. या फळात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात, त्यामुळे त्याला थंडीतील फळाचा राजा देखील म्हटले जाते. असे म्हणतात की, पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर जांब हे फळ रामबाण उपाय आहे. या फळाच्या पानामध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात.

जाबांची पाने आहेत एक उत्तम आयुर्वेदिक औषध; जाणून घ्या फायदे
जांबाची पाने
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 4:57 PM
Share

Benefits of Guava Leaves : जांब किंवा पेरू हे  थंडीत येणारे फळ आहे. या फळात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात, त्यामुळे त्याला थंडीतील फळाचा राजा देखील म्हटले जाते. असे म्हणतात की, पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर जांब हे फळ रामबाण उपाय आहे. मात्र जांब हे केवळ हिवाळ्याच्या दिवसांमध्येच येणारे फळ आहे. ते इतर दिवसांमध्ये मिळेलच याची खात्री नसते. अशावेळी तुम्ही औषध म्हणून जांबाच्या पाल्याचा देखील उपयोग करू शकतात. (Guava Leaves) या पाल्यामध्ये देखील अनेक औषधी गुणर्धम (Medicinal Properties) असतात. विविध आजारांवर जांबाच्या पाल्याचा औषध म्हणून अपयोग होतो. या फळाच्या पाल्यामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिइन्फ्लेमेटरी गुणांचा समावेश असतो, तसेच जांबाच्या पाल्यात व्हिटॅमीन सी, आयरन हे देखील मोठ्याप्रमाणात असते. आज आपन जांब आणि जांबाच्या पाल्याचे (Benefits of Guava Leaves) नेमके काय फायदे आहेत, ते आपण कोणत्या आजारासाठी वपरू शकतो, कसे वापरावे हे जाणून घेणार आहोत.

जांबाच्या पानाचे पाच महत्त्वाचे फायदे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त : जांबाच्या पानामध्ये शुगर लेव्हल कट्रोल करणारे गुणधर्म असतात. तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर जांबाच्या पानाचा चहा करून पिला तर काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात येऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांबाचे पाने वरदान मानण्यात येतात.

शरीरावरील गाठींसाठी :  जर कोणाला गाठींच्या समस्या असतील तर त्यांनी जांबाचे पाने कुटून त्याचा लेप संबंधित ठिकाणी लावल्यास काही दिवसांनी या गाठी आपोआप नष्ट होतात. तसेच त्या गाठींवरील सूज देखील कमी होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त : जांबाची पाने हे हृदयच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त असतात. जांबाची पाने नियमित खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉची पातळी नियंत्रीत असल्यास हृदय विकाराचा धक्का बसण्याची शक्यता कमी असते. ज्या रुग्णांना हृदयाच्या संबंधित काही समस्या असतील तर त्यांना जांबाचे पाने खाण्याचा सल्ला दिला जातो.

सर्दी आणि खोकल्यासाठी फायद्याचे : ज्या व्यक्तींना सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास असतो, अशा लोकांनी जर जांबाच्या पानांचा काढा करून तो नियमित पिल्यास सर्दीचा त्रास हळूहळू पूर्णपणे नष्ट होतो. अशाप्रकारचा काढा दिवसातून तीन वेळेस घेतल्यास संबंधित रुग्णाला आराम मिळतो.

महिलांच्या विविध समस्यांसाठी : महिलांनी जर दररोज सकाळी जांबाच्या दहा ते बारा पानाचा रस पिल्यास अनेक समस्या दूर होतात. जांबाचे पाने विविध आजारांवर उपयोगी असल्याने त्याला आरोग्यवर्धक मानले जाते.

टीप : ही माहिती पूर्णपणे सामान्य ज्ञानावर आधारीत आहेत, यातील कोणताही प्रयोग करून पाहण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला आवश्य घ्यावा. वरील कोणत्याही उपयांबाबत टीव्ही 9 प्रामाणिकरण करत नाही.

संबंधित बातम्या

कोरोनाची लक्षणं नाहीत, मग लहान मुलांना अॅडमिट कधी करायचं, वाचा डॉक्टर काय सांगतात…

तोल जातोय.. एक हात निष्क्रिय वाटतोय ? वेळीच सावध व्हा, ती या आजाराची तर लक्षणे नाहीत?

Corona updates: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कोरोनाचा विस्फोट, औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये काय स्थिती?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.