AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद

काही फळांच्या सेवनाने इम्युनिटी तर वाढतेच पण आपण तंदुरुस्तही होतो. त्यांचे नियमित सेवन आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 15, 2023 | 6:15 PM
Share

Vitamin C Rich Fruits : आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी (Vitamin C) खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास हृदयाशी संबंधित रोग, आरोग्य समस्या आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी संपूर्ण आरोग्यास चालना देते. व्हिटॅमिन सी जखमा लवकर भरून काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

तसेच व्हिटॅमिन सी मुळे , कूर्चा, हाडे आणि दातांची झीज कमी होते. संत्र्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण आपण अशा अनेक फळांबद्दल जाणून घेऊया ज्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते आणि ती लिंबूवर्गीय फळे नाहीत.

पेरू

पेरू हे भारताच्या कानाकोपऱ्यात आढळणारे फळ आहे. पेरूमध्येही संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. 100 ग्रॅम पेरूमध्ये 228 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.

अननस

अननस हे अतिशय चविष्ट फळ आहे. ते जितके चवदार असेल तितकेच ते व्हिटॅमिन सीने भरलेले असते. 100 ग्रॅम अननसात 48 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त असतात.

आंबा

आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. सध्या सर्वत्र आंब्यांचा घमघमाट आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात ढळते. 100 ग्रॅम आंब्यामध्ये 36 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. आंब्यामध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असते.

कीवी

किवीला चायनीज गूसबेरी असेही म्हणतात. किवी हे एक अतिशय चवदार फळ आहे जे थोडेसे आंबट असते. त्यात 93 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. किवीमुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि ते कोलेस्ट्रॉल देखील कमी करते.

या फळांच्या नियमित सेवनाने तुम्हाला पोषण मिळेल, व्हिटॅमिन सी चे प्रमाणही वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही खूप वाढेल.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.