AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heart attack | धक्कादायक! मित्रासोबत हसत-खेळत असताना 18 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक

Heart attack | नेमक काय आणि कसं घडलं? बुधवारी रात्री जेवणानंतर दीप त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी म्हणून वसतिगृहाच्या के.एम.मुन्शी हॉलमध्ये गेला.

Heart attack | धक्कादायक! मित्रासोबत हसत-खेळत असताना 18 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक
Deep Shyamji Chaudhary
| Updated on: Aug 19, 2023 | 11:30 AM
Share

अहमदाबाद : एम.एस.युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाचा कार्डिअक अरेस्टने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. दीप श्यामजी चौधरी असं मृत मुलाच नाव आहे. दीप आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. दीप चौधरी पाटन जिल्ह्याचा निवासी आहे. तो सायन्स शाखेत BSC च्या दुसऱ्यावर्षाला होता. तो शहरात पीजीमध्ये राहत होता. बुधवारी रात्री जेवणानंतर दीप त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी म्हणून वसतिगृहाच्या के.एम.मुन्शी हॉलमध्ये गेला.

“तो त्याच्या मित्रांबरोबर बोलत होता, हसण-खेळणं सुरु होतं. इतक्यात तो खाली कोसळला. मी त्यावेळी हॉस्टेलमध्ये होतो. दीपसोबत असलेल्या मुलांनी मला फोन करुन घडलेल्या प्रकाराबद्दल कळवलं” असं तेजस सोलंकीने सांगितलं. तो विद्यार्थी नेता आहे. पोस्टमार्टम रिपोर्टवर लक्ष

दीप चौधरीला SSG रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केला. कार्डिअक अरेस्टमुळे दीपचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, असं सायन्स फॅकल्टीचे डीन हरी कटारिया यांनी सांगितलं. “मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं असून रिपोर्ट आल्यावर समजेल” असं त्यांनी सांगितलं. दीप चौधरीचे वडिल सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. दीप चौधरी अभ्यासात हुशार होता. त्याला वन्यजीव फोटोग्राफीची आवड होती.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी