भारतीय क्रिकेटपटूला मोठा धक्का! लाखोंची बॅट मैदानातून चोरीला; व्हिडिओ शेअर दिली माहिती, काय घडलं?
Indian Cricket Bat Theft: भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरच्या मैदानावरून लाखो रुपये किमतीच्या बॅट चोरीला गेल्या आहेत. क्रिकेटपटूनेच एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय खेळाडूच्या बॅटची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. हा खेळाडू म्हणजे दीपक चहर आहे. त्याच्या बॅटची चोरी मैदानातून झाल्याचे समोर आले आहे. त्याची किंमत सुमारे लाखांमध्ये होती. याबाबत खुद्द दीपक चहरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने घटनेची माहिती दिली आहे.
दीपक चहरने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, तो जिथे सराव करतो त्या मैदानावरून त्याच्या तीन बॅट चोरीला गेल्या आहेत. काल संध्याकाळी मैदानावरून माझ्या तीन बॅट चोरीला गेल्या. ज्याने त्या चोरल्या त्याला त्या किती महाग होत्या हे माहीत नाही. या तीन बॅटची किंमत दीड लाख रुपये आहे. आता तो एकतर त्या विकून टाकेल किंवा टेनिस बॉलने खेळेल. त्याने माझ्याकडून पैसे घेतले असते, तर मी ते त्याला दिले असते.
दीपक चहर पुढे म्हणाला की, आता माझ्यासमोर तीन पर्याय आहेत. एकतर मी पोलिसांकडे तक्रार करेन, योगीजी किंवा मोदीजींकडे जाईन, किंवा ज्याने बॅट चोरली त्याला अक्कल येऊन ती मला परत मिळावी म्हणून थेट देवाकडे प्रार्थना करेन, असं त्याने सांगितले आहे. तसेच बॅट परत देण्याची विनंती केली आहे. ३४ वर्षीय चहरला गेल्या काही काळापासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.
Deepak Chahar says three of his Player Edition bats, worth around ₹1.5 lakh in total, were stolen from the ground. 😂
He says he now has a few options: go to the police, ask Yogi Ji or Modi Ji for help, pray to God… or simply ask SS for new bats. 😂
Deepak Chahar to the… pic.twitter.com/vaN238MyY2
— Mention Cricket (@MentionCricket) September 28, 2026
चहरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र त्याला बऱ्याच काळापासून संघात आपले स्थान पक्के करता आलेले नाही. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामने आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत आहे, परंतु त्याला या दोन्ही संघांमध्ये आपले स्थान मिळवता आलेले नाही. दीपक चहरने भारतासाठी १३ एकदिवसीय सामने खेळून १६ बळी घेतले आहेत. त्याने २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३१ बळी घेतले आहेत.
दीपक चहरने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२२ मध्ये आणि शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य असलेल्या दीपक चहरने मागील हंगामात ८ सामन्यांमध्ये ८ बळी घेतले. यापूर्वी तो सलग ६ वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. त्याने २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत १०३ आयपीएल सामन्यांमध्ये ९६ बळी घेतले आहेत.
